Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:23 IST2025-11-12T17:22:42+5:302025-11-12T17:23:32+5:30
Delhi Blast, Narendra Modi: दिल्लीतील कार स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवर! LNJP मध्ये जखमींना भेटून लगेच CCS बैठक घेतली. देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मोठे धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता.

Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह...
नवी दिल्ली: लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटामुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा हादरल्या असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौरा आटोपून परत येताच तात्काळ सूत्रे हाती घेतली आहेत. सरकारने या दहशतवादी हल्ल्याला गांभीर्याने घेतले असून, पंतप्रधानांनी केवळ राजकीय प्रतिक्रिया न देता थेट 'ॲक्शन मोड' मध्ये काम सुरू केले आहे.
भूतानहून दिल्लीत दाखल होताच, पंतप्रधानांनी सर्वप्रथम एलएनजेपी रुग्णालयात जाऊन स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली. यानंतर, ते संध्याकाळी ५.३० वाजता आपल्या निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीचा मुख्य अजेंडा
या बैठकीत केवळ दिल्लीपुरता नाही, तर संपूर्ण देशातील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात येणार आहे. या दहशतवादी कृत्याला मुळापासून उपटून काढण्यासाठी आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षा धोरणांमध्ये मोठे धोरणात्मक बदल करण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.