फास्ट वॉर : आता भाजपा खासदारांचा उपवास, पंतप्रधान मोदी - अमित शाह यांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 19:11 IST2018-04-10T19:11:24+5:302018-04-10T19:11:24+5:30
महत्वाची बाब म्हणजे या उपवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह हेही सहभागी होणार आहेत.

फास्ट वॉर : आता भाजपा खासदारांचा उपवास, पंतप्रधान मोदी - अमित शाह यांचाही समावेश
नवी दिल्ली : भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये आता फास्ट वॉर सुरु झालं आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावर उपोषण केल्यानंतर आता भाजपाचे खासदार 12 एप्रिलला दिवसभराचा उपवास करणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या उपवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह हेही सहभागी होणार आहेत.
कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा सरकार विरोधात सोमवारी उपवास केला होता. कॉग्रेसने संसदेत केलेल्या गदारोळाविरोधाच उपवास करण्याची घोषणा आधीच भाजपाने केली होती. पण आता यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सुद्धा सहभागी होणार आहेत.
All BJP MPs to also go on fast, along with PM Modi and BJP President Amit Shah, on 12 April, over disruptions during budget session of Parliament. https://t.co/EzHxmeFM5i
— ANI (@ANI) April 10, 2018
भाजपा नेते जीवीएल नरसिंह राव म्हणाले की, पक्षाचे सर्व खासदार 12 एप्रिलला उपवास करतील. राज्यसभेचे खासदारही देशातील कानाकोप-यात जाऊन विरोधकांच्या बेजबाबदारपणाला जनतेसमोर ठेवतील.
यावर सीपीआय नेते आणि राज्यसभेचे खासदार डी. राजा म्हणाले की, जर बजेट सत्र सुरळीत चाललं नाही, याला भाजपा सरकारच जबाबदार आहे. ते म्हणाले होते की, ते कावेरी मुद्दा, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, दलितांची सुरक्षा याबाबच गंभीर आहेत. पण ते यावर गंभीर नाहीत.