शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी, नेहरू यांनाही तुम्ही याच तुरुंगात ठेवले होते, विजय माल्यावरून मोदींचे इंग्लंडला खरमरीत उत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 09:28 IST

बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेजा मे यांना खरमरीत उत्तर दिले

नवी दिल्ली -  बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेजा मे यांना खरमरीत उत्तर दिले होते. माल्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना भारतातील तुरुंगांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याला मोदींनी टेरेसा मे यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान प्रत्युत्तर दिले. हे तेच तुरुंग आहेत ज्यामध्ये तुम्ही महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या नेत्यांना ठेववे होते, असे मोदी म्हणाले होते. ही माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती समोर आणली आहे. मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कारकिर्दीमधील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज म्हणाल्या,"नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल परिषदेमध्ये मोदी आणि टेरेजा मे यांची भेट झाली होती. त्या भेटीदरम्यान, मोदी म्हणाले होते की, भारतातील गुन्हेगार लोक इंग्लंडमध्ये आल्यावर त्यांच्या प्रत्यार्पणास खूप उशीर होतो. माल्याच्या खटल्यात इंग्लंडच्या न्यायालयाने विजय माल्याचे प्रत्यार्पण करण्यापूर्वी आम्ही भारतातील तुरुंग पाहणार असल्याचे म्हटले होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तेच तुरुंग आहेत. जिथे तुम्ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशा मोठमोठ्या नेत्यांना ठेवले होते. त्यामुळे या तुरुंगांवर तुमच्या न्यायालयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य होणार नाही."काही दिवसांपूर्वी  माल्या प्रकरणाची सुनावणी  करताना भारतातील तुरुंगांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच माल्याच्या प्रत्यापर्णापूर्वी भारतातील तुरुंगांच्या स्थितीचा तपास करणार असल्याचे सांगितले होते. तसेच माल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सुषमा स्वराज म्हणाल्या, विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही ब्रिटनला विनंती केली आहे. तसेच 12 बँकांच्या गटाने माल्याविरोधातील खटलाही जिंकला आहे. तसेच बँका आपल्या पैशांची वसुली करू शकतात, असे कोर्टाने सांगितले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याIndiaभारतEnglandइंग्लंड