नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 19:34 IST2025-12-14T19:34:06+5:302025-12-14T19:34:58+5:30
PM Modi on Nitin Nabin BJP President: नियुक्तीबाबत भाजपकडून अधिकृत संघटनात्मक आदेश जारी

नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
PM Modi on Nitin Nabin BJP President: नुकताच भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये दणदणीत विजय मिळवला. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासह सत्तास्थापना केल्यानंतर अखेर भाजपाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय जाहीर केला. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती १४ डिसेंबर २०२५ पासून तात्काळ लागू झाली. जेपी नड्डा यांच्याजागी नबीन यांची नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विशेष ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
नितीन नबीन हे पक्षाचे एक कर्मठ आणि समर्पित नेते म्हणून ओळखले जातात. ते तरुण आणि कष्टाळू नेते आहेत. त्यांना बराच संघटनात्मक कार्याचा अनुभव आहे. बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचे काम अत्यंत प्रभावी राहिले आहे. त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम केले आहे. ते त्यांच्या नम्र स्वभावासाठी आणि त्यांच्या तळगाळातील लोकांसाठी केलेल्या कामासाठी ओळखले जातात. मला विश्वास आहे की त्यांची ऊर्जा आणि वचनबद्धता येणाऱ्या काळात आपला पक्ष आणखी मजबूत करेल. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो," असे पंतप्रधान मोदी यांनी लिहिले.
Shri Nitin Nabin Ji has distinguished himself as a hardworking Karyakarta. He is a young and industrious leader with rich organisational experience and has an impressive record as MLA as well as Minister in Bihar for multiple terms. He has diligently worked to fulfil people’s…
— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2025
दरम्यान, या नियुक्तीबाबत भाजपकडून अधिकृत संघटनात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही नियुक्ती भाजपच्या संसदीय बोर्डाने केली आहे. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नबीन आता राष्ट्रीय स्तरावर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील.