'आपण सोबत मिळून काम करू', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 22:03 IST2025-01-27T22:01:37+5:302025-01-27T22:03:23+5:30
PM Modi calls President Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोघांमधील हा पहिलाच संवाद आहे.

'आपण सोबत मिळून काम करू', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
PM Modi calls President Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी फोनवर चर्चा केली. खुद्द पंतप्रधान मोदींनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच चर्चा आहे.
Delighted to speak with my dear friend President @realDonaldTrump@POTUS. Congratulated him on his historic second term. We are committed to a mutually beneficial and trusted partnership. We will work together for the welfare of our people and towards global peace, prosperity,…
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2025
पीएम मोदींनी त्यांच्या एक्स-पोस्टमध्ये लिहिले की, "माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन. आम्ही परस्पर फायदेशीर आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी, तसेच जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करू."
परराष्ट्रमंत्री जयशंकर शपथविधीला गेले होते
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यूएस सरकारच्या निमंत्रणावरुन 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक पत्रही ट्रम्प यांना दिले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांना फोनवर अभिनंदन केले होते.