"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 21:59 IST2025-10-06T21:58:26+5:302025-10-06T21:59:48+5:30
PM Modi call to CJI BR Gawai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
PM Modi call to CJI BR Gawai: सर्वोच्च न्यायालयात आज एक विचित्र घटना घडली. न्यायालयात एका खटल्याची सुनावणी सुरू असताना एका वकिलाने न्यायमूर्ती गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या वकिलाने पायातील बूट काढून त्यांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला. पण तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच ताब्यात घेतले आणि बाहेर काढले. त्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना हल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. या घटनेचे दिवसभरात तीव्र पडसाद उमटले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गवई यांची फोन करून चौकशी केली.
मोदी काय म्हणाले?
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः सोशल मीडिया पोस्टमध्ये या संभाषणाची माहिती शेअर केली. ते म्हणाले की, हल्ल्याच्या प्रयत्नाला तोंड देताना न्यायाधीश गवई यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. CJI गवई यांनी केलेली वर्तणूक ही न्यायमूर्तींप्रती त्यांची वचनबद्धता आणि आपल्या संविधानाच्या भावनेला बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.
Spoke to Chief Justice of India, Justice BR Gavai Ji. The attack on him earlier today in the Supreme Court premises has angered every Indian. There is no place for such reprehensible acts in our society. It is utterly condemnable.
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2025
I appreciated the calm displayed by Justice…
आरोपीच्या खिशात सापडली चिठ्ठी
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वकिलाच्या ताब्यात एक चिठ्ठी सापडली, ज्यावर लिहिले होते की, भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. न्यायालयीन कामकाजादरम्यान घडलेल्या या घटनेने अस्वस्थ न होता, सरन्यायाधीशांनी न्यायालयीन अधिकाऱ्यांना आणि तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आणि दोषी वकील राकेश कुमारला इशारा देऊन सोडून देण्यास सांगितले. सरन्यायाधीश गवई यांच्या या संयमाचे सर्वत्र कौतुक झाले. तर त्या वकीलाच्या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला.