शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

नरेंद्र मोदी व राज्यपालांना ममता बॅनर्जींची अर्धा तास वाट पाहावी लागली, बैठकीत पोहोचल्या उशिरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 5:06 PM

mamata banerjee : सरकारी सूत्रांनी दावा केला आहे की, पंतप्रधान आणि राज्यपाल यांनी आढावा बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची 30 मिनिटे वाट पाहिली.

ठळक मुद्देयास वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आज बंगाल आणि ओडिशा येथे पोहोचले. यानंतर त्यांनी राज्य सरकारांशी आढावा बैठक घेतली.

कोलकाता : दोन दिवसांपू्र्वी यास चक्रीवादळामुळे (Cyclone Yaas) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी एका आढावा बैठकीत भाग घेतला. पण, या बैठकीत नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांना सुमारे 30 मिनिटे वाट पाहावी लागली. सरकारी सूत्रांनी दावा केला आहे की, पंतप्रधान आणि राज्यपाल यांनी आढावा बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची 30 मिनिटे वाट पाहिली. (pm modi and governor dhankhar waited for 30 mins for bengal cm mamata banerjee to attend review meeting)

या घटनेसंदर्भात पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्वीट केले की, संघर्षाची ही प्रवृत्ती राज्य किंवा लोकशाहीच्या हिताची नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग न घेणे घटनात्मकता किंवा कायद्याच्या नियमांला धरून नाही. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी दिघाला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्याविषयी माहिती दिली होती. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हिंगलगंज आणि सागर येथे आढावा बैठक घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कालैकुंडा येथे भेटले आणि त्यांना पश्चिम बंगालमधील चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. माहितीसाठी त्यांना आपत्ती अहवाल सादर करण्यात आला आहे. आता दिघामधील मदत व जीर्णोद्धार कामांचा आढावा घेण्यासाठी पुढे जात आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, यास वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आज बंगाल आणि ओडिशा येथे पोहोचले. यानंतर त्यांनी राज्य सरकारांशी आढावा बैठक घेतली. परंतु बंगालमधील आढावा बैठकीत भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांना मिळालेल्या आमंत्रणावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, ममता बॅनर्जी  या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे आधीच सांगण्यात आले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीcycloneचक्रीवादळ