शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांची हवा ओसरली; आता फक्त 40% भागात भाजपाची सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 10:21 IST

दोन वर्षात अनेक महत्त्वाची राज्यं भाजपाच्या हातून गेली

मुंबई: नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर भाजपाचा देशभरात वेगानं विस्तार झाला. मोदी पंतप्रधान होताच अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली. २०१७ च्या अखेरपर्यंत देशातील ७१ टक्के भागात भाजपाची सत्ता होती. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांचं संघटन, रणनीती कौशल्य यांच्यामुळे भाजपानं देशभरात घोडदौड केली. मात्र चौखूर उधळलेला भाजपाचा वारू रोखण्यात विरोधकांना यश आल्याचं दिसत आहे. डिसेंबर २०१७ पासून भाजपाची लाट ओसरायला सुरुवात झाली. डिसेंबर २०१७ मध्ये देशातील ७१ टक्के भागात भाजपाची सत्ता होती. मात्र आता केवळ ४० टक्के भागात भाजपाची सत्ता शिल्लक आहे. त्यामुळे मोदी आणि शहा यांचा करिश्मा कमी झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या असल्या तरीही विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी खालावली. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड यांच्यासारखी महत्त्वाची राज्यं राखण्यात भाजपाला अपयश आलं. दोन वर्षात अनेक राज्य गमावणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रातही धक्का बसला. राज्यात मोठा सर्वात पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता सोडण्याची नामुष्की आली. देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अजित पवारांच्या शपथविधी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांना एकत्र आणत भाजपाचं सत्ता स्थापनेचं स्वप्न धुळीस मिळवलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र