शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

PM Kisan Samman Nidhi Yojana: खूशखबर! पीएम किसानच्या 4000 रुपयांसोबत आणखी तीन फायदे मिळण्याची शक्यता, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 13:22 IST

PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे खात्यात टाकले जाणार आहेत. ही रक्कम केंद्र सरकार दुप्पट करण्याचा विचार करत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे खात्यात टाकले जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांना देत असलेली रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये मिळू शकतात.

लवकरच 10 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. पण, याचबरोबर मोदी सरकार आणखी तीन फायदे देण्याची तयारी करत आहे. 

किसान क्रेडिट कार्ड (KCC kisan credit card)आता किसान क्रेडिट कार्ड देखील पीएम किसान योजनेशी जोडले गेले आहे. केसीसी बनवण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून हे करण्यात आले आहे. म्हणजेच सरकार ज्याला 6000 रुपये देत आहे, त्यांना KCC बनवणे सोपे होणार आहे. सध्या सुमारे 7 कोटी शेतकऱ्यांकडे KCC आहे, तर सरकारला आणखी एक कोटी लोकांना लवकरात लवकर समाविष्ट करायचे आहे आणि त्यांना 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे.

पीएम किसान मानधन योजनाजर एखादा शेतकरी पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीत. कारण अशा शेतकऱ्याची संपूर्ण कागदपत्रे भारत सरकारकडे आहेत. या योजनेअंतर्गत, शेतकरी पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकतात. त्यामुळे त्याला थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याच्या प्रीमियममधून 6000 रुपये कापले जातील.

किसान कार्ड बनवण्याची योजनामोदी सरकार पीएम किसान योजनेच्या डेटावर आधारित शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी (Unique farmer ID) तयार करण्याच्या तयारीत आहे. हे ओळखपत्र पीएम किसान आणि राज्यांच्या भूमी अभिलेख डेटाबेसशी लिंक करून बनवण्याची योजना आहे. यानंतर शेतीशी संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सोपे होणार आहे.

संबंधीत बातम्या...

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 6000 रुपये पती-पत्नीला मिळू शकतात का? जाणून घ्या कोण कोण पात्र, अपात्र...

PM Kisan Samman Nidhi Refund List: 'या' शेतकऱ्यांना पीएम किसानचे सर्व हप्ते परत करावे लागणार; यादीत तुमचे नाव तपासा...

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी