महाराष्ट्राच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक; नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:35 IST2025-01-03T07:34:32+5:302025-01-03T07:35:20+5:30
दुर्गम व नक्षलवादग्रस्त भागांच्या विकासासाठीही महाराष्ट्र सरकार काही योजना राबवत आहे.

महाराष्ट्राच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक; नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी प्रशंसा
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये ११ नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून सन्मानाने जीवन जगण्याची शपथ बुधवारी घेतली. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांना हिंसाचारापासून परावृत्त करण्यासाठी व नक्षलग्रस्त भागांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रसरकार करत असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कौतुक केले.
दुर्गम व नक्षलवादग्रस्त भागांच्या विकासासाठीही महाराष्ट्र सरकार काही योजना राबवत आहे. त्याबाबत मोदी यांनी महाराष्ट्र सरकारची प्रशंसा केली आहे. गडचिरोलीत ११ जणांनी शस्त्र खाली ठेवले व सन्मानाने जीवन जगण्याची शपथ बुधवारी घेतली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते.
‘प्रगतीचा नवा मार्ग खुला होईल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, दुर्गम आणि नक्षलवादाची झळ लागलेल्या भागांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांकरिता मी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करतो. यामुळे त्या भागातील जीवनमान सुधारण्यास मदत तसेच प्रगतीसाठी नवा मार्ग खुला होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पोस्टला दिलेल्या उत्तरात मोदी यांनी महाराष्ट्र सरकारची प्रशंसा केली.