भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला; लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 06:25 IST2024-07-28T06:23:55+5:302024-07-28T06:25:42+5:30

ही चकमक काही तास सुरू होती. 

plot to capture indian post foiled in kupwara district | भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला; लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा

भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला; लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: जम्मू-काश्मीरनजीक नियंत्रण रेषेवर कुपवाडा जिल्ह्यातील त्रेहगाम क्षेत्रातील कुमकडी येथे भारताच्या चौकीवर कब्जा मिळविण्याचा पाकिस्तानचा कट भारतीय लष्कराने शनिवारी हाणून पाडला. या चकमकीत एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा करण्यात आला. यावेळी भारताचा एक जवानही शहीद झाला असून, कॅप्टन या पदावरील अधिकाऱ्यासहित चारजण जखमी झाले. ही चकमक काही तास सुरू होती. 

यासंदर्भात लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या कुुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीम (बीएटी)च्या सैनिकांनी भारतीय चौकीवर हल्ला करून ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा कट भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन हाणून पाडला. त्यात पाकिस्तानी घुसखोर ठार झाला असून, भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. नियंत्रण रेषेवर कामकारी बीएटीच्या कमांडोंनी क्षेत्रामध्ये भारतीय लष्कराच्या एका चौकीवर हल्ला करण्यात आला. 

अनेक तास संघर्ष

चकमकीत एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा करण्यात आला. तर यावेळी भारताचा एक जवान शहीद झाला. तसेच  कॅप्टन या पदावरील अधिकारी आणि अन्य तीन जवान जखमी झाले. ही चकमक अनेक तास सुरू होती. 

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक

पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीम (बॅट)च्या तीन कमांडोंनी नियंत्रण रेषेवरील चौकीवर आधी ग्रेनेड हल्ला केला. चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: plot to capture indian post foiled in kupwara district