कान्होलीबारा परिसरात वृक्षारोपण

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

कान्होलीबारा

Plantation in Kanholibara area | कान्होलीबारा परिसरात वृक्षारोपण

कान्होलीबारा परिसरात वृक्षारोपण

न्होलीबारा
स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगणा वन परिक्षेत्रांतर्गत ३९ गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या परिसरात प्रत्येकी २० प्रमाणे एकूण ७८० रोपट्यांची लागवड करण्यात आली. या सर्व रोपट्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही संबंधित गावांमधील तरुणांवर सोपविण्यात आली. सामाजिक बांधिलकी म्हणून तरुणांनी ही जबाबदारी स्वीकारली, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी दिली. ही रोपटी वन कर्मचाऱ्यांनी संबंधित गावांमधील शाळांना पोहोचवून दिली होती. हिंगणा तालुक्यातील बिबी (सावळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात मुख्याध्यापक नरेंद्र आदेवार, संघपाल शंभरकर, मनोज झाडे, वनरक्षक सीमा पेरकांडे, महल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
बिबी (सावळी) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच रमेश झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मनोज झाडे, दशरथ लिडबे, विठ्ठल गव्हाणे, विठ्ठल बुधबावरे, सुनंदा बुधबावरे, अवधूत उडाण, नरेंद्र आदेवार, संघपाल शंभरकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
***

Web Title: Plantation in Kanholibara area