विमान उड्डाण करणार होते, अचानक प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला; प्रवाशांमध्ये खळबळ उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:27 IST2025-01-28T19:16:08+5:302025-01-28T19:27:04+5:30
जोधपूर विमानतळावर उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानाचे अचानक एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला.

विमान उड्डाण करणार होते, अचानक प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला; प्रवाशांमध्ये खळबळ उडाली
राजस्थानमधील जोधपूर विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी बंगळुरूला जाण्यासाठी एक विमान सज्ज होते. सर्व प्रवासी आपल्या सीटवर बसून तयार होते. केबिन क्रू टेकऑफची तयारी करत होते. हे विमान सकाळी १०:१० वाजता उड्डाण करणार होते, पण काही वेळातच एक प्रवासी जाग्यावरुन उठला आणि आपत्कालीन एक्झिटचा दरवाजा उघडला. यामुळे सर्वच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. गोंधळ सुरू झाला.
"4 बंगले तोडून 'शीशमहल' तयार केला..."; गृहमंत्री अमित शाह यांचा केजरीवालांवर मोठा हल्ला
विमानाचा आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडताच. पायलटला याची माहिती मिळाली. प्रवाशाच्या या कृतीमुळे विमानात गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर, वैमानिक आणि केबिन क्रूने यांनी प्रोटोकॉल सुरू केले. त्यानंतर प्रवाशाला अटक करून सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाचे नाव सिराज किदवई असे आहे. तो अॅक्सिस बँकेत नोकरी करतो. चुकून फ्लॅप उघडला असा दावा केला आहे. विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडताच, पायलटला सिग्नल देण्यात आला. यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रवाशाला विमानातून बाहेर काढले.
या घटनेवर इंडिगोने निवेदन प्रसिद्ध केले. इंडिगोने सांगितले की, आज, जोधपूरहून बंगळुरूला जाणाऱ्या फ्लाईट 6E 6033 च्या प्रस्थानापूर्वी सुरक्षा ब्रीफिंग दरम्यान, एका प्रवाशाने आपत्कालीन एक्झिट फ्लॅप उघडला. कर्मचाऱ्यांनी ताबडतोब मानक कार्यपद्धतींचे पालन केले. नंतर प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आले आणि चौकशीसाठी कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.
२० मिनिट उशीरा उड्डाण
कंपनीने म्हटले आहे की, विमानातील इतर प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते आणि आमच्या सर्व कामकाजात सुरक्षिततेचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत," असे एअरलाइनने म्हटले आहे. जोधपूरमधील विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये सीआयएसएफचे कर्मचारी प्रवाशाची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे विमानाच्या उड्डाणात २० मिनिटे उशीर झाला.