शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:29 IST

Tata Group Air India Plane Crash: एअर इंडिया अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना टाटा समूहाने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. हे दुःख शब्दात व्यक्त करता न येण्यासारखे नाहीये, असे म्हणत टाटा सन्सचे चंद्रशेखरन यांनी मदतीसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

Air India Plane Crash Tata Group: 'या क्षणाला जे दुःख झालं आहे, ते व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. ज्यांनी या अपघातात प्राण गमावले आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना', अशा शब्दात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी शोक व्यक्त केला. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर हे विमान कोसळून प्रवासी आणि क्रू मेबर्स अशा २४० जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटामध्ये हे विमान कोसळले. 

मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटी, जखमींचा खर्च करणार

या विमान अपघातानंतर टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एक शोक व्यक्त केला. 

चंद्रशेखरन म्हणाले, "आम्हाला एअर इंडियाच्या फ्लाइट १७१ च्या वाईट घटनेमुळे मनापासून दु:ख झाले आहे. या क्षणी आम्हाला झालेले दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, तसेच जे जखमी झाले आहेत, त्या सर्वांच्या आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत."

वाचा >>काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला

"या दुःखद घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा समूह १ कोटी रुपये आर्थिक मदत देईल. तसेच जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय खर्च आम्ही करू आणि त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार व सहकार्य मिळेल याची काळजी घेऊ. याशिवाय, बी जे मेडिकलच्या होस्टेलच्या उभारणीसाठीही आम्ही मदत करू", असे चंद्रशेखरन यांनी सांगितले. 

"या कठीण काळात ज्या कुटुंबांवर हे दुःख कोसळले आहे, त्यांच्या आम्ही ठामपणे उभे आहोत", अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

२०४ मृतदेह काढले बाहेर, ४१ जणांवर उपचार सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील २४० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मृतदेह पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत आहे. काही मृतदेहांचे शिर आणि इतर अवयव तुटले गेले आहेत. या सगळ्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. पोलीस आयुक्ती दिलेल्या माहितीनुसार ४१ जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाTataटाटाAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमानahmedabadअहमदाबाद