गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला; अजब विधानामुळे पीयूष गोयल सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 08:46 AM2019-09-13T08:46:58+5:302019-09-13T08:57:41+5:30

गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला, मग न्यूटननं काय केलं?, नेटकऱ्यांचा सवाल

piyush goyal trolled on social media after his einstein discovered gravity remarks | गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला; अजब विधानामुळे पीयूष गोयल सोशल मीडियावर ट्रोल

गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला; अजब विधानामुळे पीयूष गोयल सोशल मीडियावर ट्रोल

Next

नवी दिल्ली: ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं दोनच दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. यानंतर आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली. 

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननं लावला होता. मात्र न्यूटनऐवजी आईनस्टाईनचं नाव घेतल्यानं सोशल मीडियानं गोयल यांना ट्रोल केलं आहे. मोदी-१ मध्ये अर्थ मंत्रालय सांभाळलेल्या आणि सध्या रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या गोयल यांनी काल ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवरील प्रश्नाला उत्तर दिलं. अर्थव्यवस्थेचा सध्याचा वाढीचा वेग अतिशय कमी आहे. याच गतीनं अर्थव्यवस्था वाढत राहिल्यास ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट कसं गाठणार, असा प्रश्न गोयल यांना विचारण्यात आला होता. 



अर्थव्यवस्थेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी फार गणितात जाऊ नका, असं म्हणत सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. 'टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या आकडेवारीत जाऊ नका. आपल्याला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था व्हायचंय. त्यासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग १२ टक्के असायला हवा. सध्या ती ६-७ टक्क्यानं वाढतेय, या गणितात जाऊ नका,' असं गोयल म्हणाले. यानंतर गोयल थेट आईनस्टाईन आणि गुरुत्वाकर्षणाचा संदर्भ दिला. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं गोयल बोलून गेले. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची जोरदार खिल्ली उडवली. 









गोयलजी, गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटननं लावला होता. आईनस्टाईननं सापेक्षतेचा सिद्धांत मांडला होता, असं ट्विट करत सोशल मीडियानं केंद्रीय मंत्र्यांना ट्रोल केलं. गोयल यांच्या अजब विधानानंतर अवघ्या थोड्याच वेळात ते ट्विटवर ट्रेंड झाले. याशिवाय आईनस्टाईन आणि न्यूटनदेखील ट्रेडिंगमध्ये आले. 

Web Title: piyush goyal trolled on social media after his einstein discovered gravity remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.