पाच राज्यांत लस प्रमाणपत्रांवर नसेल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 07:20 IST2022-01-10T07:14:27+5:302022-01-10T07:20:15+5:30

काेविन प्लॅटफाॅर्मवर आवश्यक बदल करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Photo of Prime Minister Narendra Maedi not on vaccine certificates in five states | पाच राज्यांत लस प्रमाणपत्रांवर नसेल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र

पाच राज्यांत लस प्रमाणपत्रांवर नसेल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गाेवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे या राज्यांमध्ये काेविड प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र राहणार नाही. 

याबाबत काेविन प्लॅटफाॅर्मवर आवश्यक बदल करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षीही झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीची पावले उचलण्यात आली हाेती. विरोधकांनीही अनेकवेळा लस प्रमाणपत्रावर पंतप्रधानाचे छायाचित्र छापण्यास आक्षेप घेतला हाेता. 

Web Title: Photo of Prime Minister Narendra Maedi not on vaccine certificates in five states