भाजपा आमदार बघत होते प्रियंकांचे छायाचित्र
By Admin | Updated: December 12, 2014 02:32 IST2014-12-12T02:32:24+5:302014-12-12T02:32:24+5:30
बुधवारी भाजपाचे आमदार प्रभू चव्हाण हे मोबाईलवर प्रियंका गांधींचे छायाचित्र झूम करून पाहत असल्याचे तेथील टीव्ही कॅमे:यांनी चित्रबद्ध केले होते.

भाजपा आमदार बघत होते प्रियंकांचे छायाचित्र
बेळगावी : सभागृहाचे कामकाज सुरू असताना मोबाईलवर प्रियंका गांधी यांचे छायाचित्र न्याहाळणा:या भाजपा आमदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभा गुरुवारी काही वेळासाठी स्थगित करावी लागली.
बुधवारी भाजपाचे आमदार प्रभू चव्हाण हे मोबाईलवर प्रियंका गांधींचे छायाचित्र झूम करून पाहत असल्याचे तेथील टीव्ही कॅमे:यांनी चित्रबद्ध केले होते. एवढेच नव्हे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचेही फोटो पाहत असलेले या चित्रफितीत दिसले. त्यांच्या तशा वागण्याने आपल्या नेत्यांच्या सन्मानाला धक्का लागल्याचे या सदस्यांचे म्हणणो होते. सभागृहाचे कामकाज सुरू असताना तिकडे लक्ष न देता आपल्या मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यात दंग असलेल्या भाजपा आमदार यू.बी. बंकर यांचेही चित्रीकरण यावेळी टीव्हीत झाले होते. यावेळी सभागृहात ऊस उत्पादकांविषयी चर्चा सुरू होती.
या घटनेबद्दल भाजपाची मान जेव्हा खाली गेली तेव्हा चव्हाण यांनी, एका घोषणोला वाचवण्याकरिता त्यांनी प्रियंका गांधी यांचा फोटो मोठा करून पाहिला होता असे म्हटले. या मुद्याबाबत कायदा व संसदीय मंत्री टी.बी. जयचंद्र यांनी चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. (वृत्तसंस्था)