PF Interest Deposit: आनंदाची बातमी! EPFO कडून व्याजाचे पैसे आले; घरबसल्या असा करा बॅलन्स चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 04:36 PM2021-11-29T16:36:39+5:302021-11-29T16:40:12+5:30

PF Interest Deposited: यंदा ईपीएफओने 8.5 टक्के व्याज दिले आहे. तुमच्याक़डे पीएफ खात्याशी संलग्न केलेला मोबाईल नंबर असेल तर आलेले व्याज तुम्ही तपासू शकता.

PF Interest Deposit: Interest paid from EPFO on 21 crore account; how to check PF Balance from home | PF Interest Deposit: आनंदाची बातमी! EPFO कडून व्याजाचे पैसे आले; घरबसल्या असा करा बॅलन्स चेक

PF Interest Deposit: आनंदाची बातमी! EPFO कडून व्याजाचे पैसे आले; घरबसल्या असा करा बॅलन्स चेक

googlenewsNext

भारत सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफचे व्याज खातेदारांच्या खात्यात वळते केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने सांगितले की, एकूण 21.38 कोटी खात्यांमध्ये व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत. 

ईपीएफओने सोमारी ट्विट करून याची माहिती दिली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 21.38 कोटी खात्यांमध्ये वार्षिक 8.50 टक्के दराने व्याज वळते करण्यात आले आहे. तुम्हीही पीएफ खातेधारक असाल आणि तुम्हाला अद्याप एसएमएस आला नसेल तर तुम्ही घरबसल्या व्याज आले की नाही ते सहज तपासू शकता. 

यंदा ईपीएफओने 8.5 टक्के व्याज दिले आहे. तुमच्याक़डे पीएफ खात्याशी संलग्न केलेला मोबाईल नंबर असेल तर आलेले व्याज तुम्ही तपासू शकता. तुम्ही एसएमएसद्वारे पीएफ खात्यावरील बॅलन्स तपासू शकता. यासाठी EPFO ने क्रमांक जारी केला आहे. अधिकृत मोबाईल नंबरवरून तुम्ही 7738299899 वर एसएमएस पाठवू शकता. तुम्ही एसएमएस पाठविताच EPFO तुम्हाला माहिती पाठवून देईल. 


 

कसा पाठवाल एसएमएस? (How to check balance of PF Acconut by SMS)
SMS पाठविण्याची पद्धत खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला 'EPFOHO UAN' लिहून 7738299899 या क्रमांकावर मेसेज करावा लागेल. ही सुविधा इंग्रजी, हिंदी, मराठी आदी दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. ही माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला UAN,  पॅन आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे. 

मिस्ड कॉलद्वारे पीएफची रक्कम जाणून घ्या (check PF Balance by missed Call)
तुम्ही फक्त एका मिस कॉलवर तुमच्या पीएफ खात्याचे सर्व तपशील जाणून घेऊ शकता. EPFO ने हा (011-22901406) क्रमांक जारी केला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून त्यावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. तुम्ही या नंबरवर कॉल करताच, काही सेकंदांची रिंग वाजल्यानंतर फोन डिस्कनेक्ट होईल आणि त्यानंतर मेसेजद्वारे खात्याची संपूर्ण माहिती पोहोचेल.

संबंधित बातमी...

EPF Balance Online: पीएफचा बॅलन्स कसा तपासावा? एकाच प्रश्नावर चार सोपे पर्याय; तुमच्या सोईचा जाणून घ्या...

Read in English

Web Title: PF Interest Deposit: Interest paid from EPFO on 21 crore account; how to check PF Balance from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.