Petrol price hiked, diesel price hiked to Rs 83 | पेट्रोल भडकलं, डिझेलचे दरही ८३ रुपयांवर; असे आहेत महाराष्ट्रातील या चार महानगरांतील इंधन दर

पेट्रोल भडकलं, डिझेलचे दरही ८३ रुपयांवर; असे आहेत महाराष्ट्रातील या चार महानगरांतील इंधन दर

नवी दिल्ली : मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर सलग दुसऱ्या दिवशी २५ पैशांनी वाढून ८५.२० रुपये लिटर झाले. हा पेट्रोलच्या दराचा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, डिझेल पंचाहत्तरी पार करून ७५.३८ रुपये लिटर झाले आहे.

मध्ये तीन दिवसांच्या विश्रामानंतर सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारीही दरवाढ करण्यात आली. देशातील इतर महानगरांतही पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत डिझेल ८२ रुपयांच्यावर गेले असून, पेट्रोल ९१.८० रुपये लिटर झाले आहे. कोलकातात डिझेल ७८.९७ रुपये लिटर, तर पेट्रोल ९०.१६ रुपये लिटर झाले.

सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) या कंपन्यांनी जवळपास महिनाभरानंतर ६ जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेण्यास सुरुवात केली होती. 
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत दरांत वाढ केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या चार महानगरांतील इंधन दर -
पेट्रोल -

मुंबई -     ९१.७८ ( ०.२४)
नागपूर -     ९१.६५ ( ०.२४)
पुणे -     ९१.४७ ( ०.२४)
औरंगाबाद - ९३.०१ ( ०.२४)

डिझेल
मुंबई -     ८२.११ ( ०.२६)
नागपूर -     ८०.७८ ( ०.२६)
पुणे -     ८०.५८ ( ०.२६)
औरंगाबाद - ८३.३५ ( ०.२७)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Petrol price hiked, diesel price hiked to Rs 83

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.