पेट्रोलच्या दराने गाठली 'शंभरी' अन् पंपचालकांनी लगेचच थांबवली विक्री; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 01:48 PM2021-02-14T13:48:56+5:302021-02-14T14:01:51+5:30

Fuel Price Hike : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सलग सहाव्या दिवशी वाढ केली आहे.

petrol price hike petrol price reached rs 100 in bhopal some petrol pumps stopped selling | पेट्रोलच्या दराने गाठली 'शंभरी' अन् पंपचालकांनी लगेचच थांबवली विक्री; जाणून घ्या कारण

पेट्रोलच्या दराने गाठली 'शंभरी' अन् पंपचालकांनी लगेचच थांबवली विक्री; जाणून घ्या कारण

googlenewsNext

नवी दिल्ली - इंधन दरात वाढ झाल्याने कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सलग सहाव्या दिवशी वाढ केली आहे. रविवारी (14 फेब्रुवारी) देखील पेट्रोल-डिझेल महागले आहे. पेट्रोलच्या दराने 'शंभरी' गाठली असून पंपचालकांनी लगेचच विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर लगेचच जुन्या पेट्रोल पंपावर प्रीमियम पेट्रोलची विक्री बंद करण्यात आली आहे. 

प्रीमियम पेट्रोलचा दर हा प्रति लीटर तब्बल 100 रुपयांच्या वर गेला आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या जुन्या मशीनमध्ये तीन डिजिट दाखवले जात नाही आहेत. त्यामुळेच साध्या पेट्रोलचा दर हा प्रति लीटर 100 च्या वर गेल्यानंतर देखील अनेक पेट्रोल पंपावर त्याची विक्री बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी संसदेत पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे.

मुंबईत पेट्रोल प्रति लीटर 95 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर दिल्लीत पेट्रोल 88.73 आणि डिझेल 79.06 रुपये झाले आहे. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये तीन कंपन्यांचे 398 पेट्रोल पंप आहेत. यातील अनेक पंपावर नवीन मशीन लावण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी तीन डिजिटचा नंबर दाखवण्यात अडचणी येत आहेत. ज्या मशीनवर नवा डिजिटल डिस्पेंसर लावण्यात आला आहे तिथे ही समस्या दाखवणार नाही. मात्र काही ठिकाणी अद्यापही अडचण येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कसे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर?

आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, हे तेल भारतात आणण्यासाठी करण्यात येणारा खर्च, रुपयाच्या तुलनेतील डॉलरचा दर यानुसार इंधनाचा दर निश्चित होतो. यानंतर पेट्रोल, डिझेलचा दर 25 ते 30 रुपये प्रति लिटरपर्यंत जातो. पण त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारं त्यावर विविध कर लावतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची किंमत वाढत जाते. पेट्रोल, डिझेलची सध्याची किंमत पाहिली, तर त्यात करांचं प्रमाण तब्बल 65 ते 70 टक्के इतकं आहे.

कसे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर?

आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, हे तेल भारतात आणण्यासाठी करण्यात येणारा खर्च, रुपयाच्या तुलनेतील डॉलरचा दर यानुसार इंधनाचा दर निश्चित होतो. यानंतर पेट्रोल, डिझेलचा दर 25 ते 30 रुपये प्रति लिटरपर्यंत जातो. पण त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारं त्यावर विविध कर लावतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची किंमत वाढत जाते.


 

Web Title: petrol price hike petrol price reached rs 100 in bhopal some petrol pumps stopped selling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.