शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

Petrol Diesel Price: पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? मोदी सरकारनं दर्शवली तयारी; सीतारामन यांचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 19:52 IST

Petrol Diesel Price: पुढील जीएसटी परिषदेत होणार पेट्रोल, डिझेलबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल शंभर रुपये लीटरच्या जवळ पोहोचलं आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे अन्नधान्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र असं केल्यास महसूल बुडेल आणि त्याचा परिणाम विकासकामांवर, प्रकल्पांवर होईल, असं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. पेट्रोल, डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत आणण्याची मागणी कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. अखेर आता मोदी सरकारनं या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.सर्वसामान्यांना मिळणार दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता, कारण...लोकसभेत वित्त विधेयक-२०२१ वर चर्चा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन पेट्रोल, डिझेलवर बोलल्या. जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत पेट्रोल, डिझेलवर चर्चा करण्यात येईल, असं सीतारामन म्हणाल्या. सरकार यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. 'पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्यासाठी पुढील जीएसटी परिषदेत चर्चा केली जाईल. केंद्राची तशी तयारी आहे,' असं सीतारामन यांनी म्हटलं.बाजारात भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर मात्र दुर्लक्ष का करतो?पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्यास राज्यं तयार असल्यास त्यांनी पुढे येऊन चर्चेचा प्रस्ताव द्यावा. आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यास आनंदच होईल, असं सीतारामन म्हणाल्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख केला. 'पेट्रोल, डिझेलवर राज्यांमध्ये कमी-अधिक कर आहेत. मला याबद्दल फारसं बोलायचं नाही. पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सर्वाधिक कर आहे,' असं सीताराम म्हणाल्या.

कसे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर?आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, हे तेल भारतात आणण्यासाठी करण्यात येणारा खर्च, रुपयाच्या तुलनेतील डॉलरचा दर यानुसार इंधनाचा दर निश्चित होतो. यानंतर पेट्रोल, डिझेलचा दर २५ ते ३० रुपये प्रति लिटरपर्यंत जातो. पण त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारं त्यावर विविध कर लावतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची किंमत वाढत जाते. पेट्रोल, डिझेलची सध्याची किंमत पाहिली, तर त्यात करांचं प्रमाण तब्बल ६५ ते ७० टक्के इतकं आहे. कोण ठरवतं पेट्रोल, डिझेलचे दर?२०१७ पूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला होता. पण जून २०१७ मध्ये सरकारनं हा अधिकार तेल कंपन्यांना दिला. देशातील तेल कंपन्या अतिशय नफ्यात आहेत. त्यांच्या माध्यमातून केंद्राला प्रचंड मोठा महसूल मिळतो आणि त्यामुळेच सर्वसामान्यांना स्वस्तात पेट्रोल, डिझेल मिळत नाही. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGSTजीएसटी