Petrol Diesel Price Hike: Nagaland government cuts taxes on petrol and diesel | केंद्र जुमानेना! या राज्याने पेट्रोल 2.20 रुपयांनी अन् डिझेल 57 पैशांनी केले स्वस्त

केंद्र जुमानेना! या राज्याने पेट्रोल 2.20 रुपयांनी अन् डिझेल 57 पैशांनी केले स्वस्त

देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरांनी (Petrol Diesel Price Hike) सामान्यांच्या खिशाला आग लावली आहे. गेले दोन दिवस इंधनाच्या दरात वाढ झाली नव्हती, मात्र आज पुन्हा 35 पैशांची वाढ झाल्याने पेट्रोलचे दर वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दरवाढीला युपीए सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. तर अर्थमंत्र्यांनी परिस्थिती गंभीर असून केंद्र आणि राज्याने चर्चा करून दर कमी करावेत असे म्हटले होते. (Amid the rise of fuel prices in the country, the Nagaland government on Monday cut down taxes on petrol, diesel and other motor spirits.)

 
गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालसह काही राज्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. मात्र, हे एक नाहीतर दोन रुपये एवढेच कमी केले होते. यामुळे अन्य राज्यांवर इंधनाचे दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे. परंतू केंद्र सरकार कमी करत नाही तर आम्ही का करायचे यावर ही राज्ये अडून बसली आहेत. दुसरीकडे नागालँडसारख्या छोट्या राज्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करत जनतेसाठी करोडोंच्या महसुलावर पाणी सोडले आहे. 


नागालँड सरकारने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील कर  29.80% वरून कमी करून 25% प्रति लीटर किंवा किंमत 18.26 रुपयांनी घटवून 16.04 रुपये प्रती लीटर जे अधिक असेल ते, केले आहे. यामुळे पेट्रोल जास्तीत जास्त 18.26 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या करात 17.50% वरून 16.50 % प्रति लीटर किंवा 11.08 रुपयांवरून घटवून 10.51 रुपये प्रति लीटर जो अधिक असेल तो केला आहे. यामुळे 22 फेब्रुवारीच्या रात्रीपासून नालालँडमध्ये पेट्रोल 2.20 रुपयांनी अन् डिझेल 57 पैशांनी स्वस्त झाले आहे. तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. त्यानुसार गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमागड ते मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये किरकोळ पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. 

मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 91.12 रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेलची 84.24 रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जात आहे. मुंबईत डिझेलचे दर 88.44 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर
नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर
नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Petrol Diesel Price Hike: Nagaland government cuts taxes on petrol and diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.