पेट्रोल-डीझेलची दर वाढ, ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार; तब्बल ११ रुपयांपर्यंत वाढले भाव! बघा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:31 IST2026-04-01T10:29:48+5:302026-04-01T10:31:27+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार, यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थातच बदलत्या जागतिक परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.

Petrol-diesel price hike, additional burden on consumers' pockets Prices increased by as much as Rs 11 See new rates | पेट्रोल-डीझेलची दर वाढ, ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार; तब्बल ११ रुपयांपर्यंत वाढले भाव! बघा नवे दर

पेट्रोल-डीझेलची दर वाढ, ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार; तब्बल ११ रुपयांपर्यंत वाढले भाव! बघा नवे दर


देशभरात प्रीमियम पेट्रोल सोबतच आता प्रीमियम डिझेलच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून तेल कंपन्यांनी प्रीमियम डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे १.५० रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.

असं आहे दरवाढी मागचं कारण... - 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार, यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थातच बदलत्या जागतिक परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.

विविध क्षेत्रांवर परिणाम -
या इंधन दरवाढीमुळे वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक घटकांवरील आर्थिक भार वाढणार आहे. आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रीमियम डिझेलचा दर प्रति लिटर ९५ ते ९६ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. खरेतर, प्रीमियम डिझेल हे इंजिनसाठी उत्तम मानले जाते. मात्र, वाढत्या किमतींमुळे आता त्याचा वापर काही आंशी कमी होऊ शकतो.

असे आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर -
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) दिलेल्या माहितीनुसार, XP१०० अर्थात १०० ऑक्टेन पेट्रोलची किंमत १४९ रुपयांवरून वाढून आता १६० रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तसे, 'एक्स्ट्रा ग्रीन' प्रीमियम डिझेलची किंमत ९१.४९ रुपयांवरून ९२.९९ रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. अर्थात प्रीमियम पेट्रोलच्या दरात तब्बल ११ रुपये, तर डिझेलच्या दरात तब्बल १.५० रुपयांची वाढ झाली आहे.

तत्पूर्वी, २० मार्च रोजी प्रीमियम पेट्रोलच्या दरात २ ते २.३५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, सध्या सामान्य पेट्रोलच्या किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल.

Web Title : पेट्रोल-डीजल की कीमतों में बढ़ोतरी: उपभोक्ताओं पर बोझ, कीमतें ₹11 तक बढ़ीं!

Web Summary : प्रीमियम पेट्रोल और डीजल की कीमतों में वृद्धि, उपभोक्ताओं पर असर। डीजल ₹1.50/लीटर महंगा। अंतर्राष्ट्रीय कच्चे तेल की कीमतें और रुपये में उतार-चढ़ाव कारण बताए गए। परिवहन, लॉजिस्टिक्स और कृषि क्षेत्रों पर बढ़ा आर्थिक बोझ। पेट्रोल ₹11 और डीजल ₹1.50 महंगा हुआ।

Web Title : Petrol-Diesel Price Hike: Consumers Burdened, Prices Up to ₹11 Increased!

Web Summary : Premium petrol and diesel prices surge, impacting consumers. Diesel up ₹1.50/liter. International crude oil prices and rupee fluctuations cited as reasons. Transportation, logistics, and agriculture sectors face increased costs. Petrol increased by ₹11 and diesel by ₹1.50.