ईडी, सीबीआयच्या दुरुपयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 07:59 IST2023-03-25T06:06:41+5:302023-03-25T07:59:22+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांचा समावेश असलेल्या पीठापुढे त्यावर ५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

ईडी, सीबीआयच्या दुरुपयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ईडी आणि सीबीआयचा मनमानी वापर होत असल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी काँग्रेससह १४ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांचा समावेश असलेल्या पीठापुढे त्यावर ५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी, माकप, भाकप, समाजवादी पार्टी, जनता दल युनायटेड, भारत राष्ट्र समिती, द्रमुक, तृणमूल, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स अशा चौदा पक्षांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
गुरुवारी यापैकी बहुतांश विरोधी पक्षांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकीत ईव्हीएमच्या दुरुपयोगावर रणनीती ठरविली होती. ईडी - सीबीआयच्या कारवाईत अटकेपूर्वी आणि अटकेनंतरच्या स्थितीवर निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.