सुशांतसिंहप्रकरणी   याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 04:21 IST2020-12-08T04:21:25+5:302020-12-08T04:21:56+5:30

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूची चौकशी कोणत्या स्तरावर आहे याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने बाळगलेल्या शांततेबद्दल प्रश्न विचारणारी फौजदारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली.

Petition filed in Sushant Singh case | सुशांतसिंहप्रकरणी   याचिका दाखल

सुशांतसिंहप्रकरणी   याचिका दाखल

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूची चौकशी कोणत्या स्तरावर आहे याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने बाळगलेल्या शांततेबद्दल प्रश्न विचारणारी फौजदारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. सीबीआयने दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिला जावा, असे आवाहनही याचिकेत करण्यात आले आहे. 
मुंबईच्या रहिवासी पुनीत कौर धांदा आणि त्यांचे पती व सर्वोच्च न्यायालयातील वकील विनोद धांदा यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सीबीआयकडून चौकशी व्हावी या बिहार सरकारने केलेल्या शिफारशीला मान्यता देऊन जवळपास चार महिने झाले आहेत याची आठवणही या याचिकेत करून दिली.

Web Title: Petition filed in Sushant Singh case