विमानात दारू प्यायलेल्या व्यक्तीने केली महिलेच्या सीटवर लघुशंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 23:32 IST2018-09-01T23:32:06+5:302018-09-01T23:32:10+5:30
दारू प्यायलेल्या एका पुरुष प्रवाशाने विमानात महिलेच्या आसनावर लघवी केली. न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही किळसवाणी घटना घडली.

विमानात दारू प्यायलेल्या व्यक्तीने केली महिलेच्या सीटवर लघुशंका
नवी दिल्ली : दारू प्यायलेल्या एका पुरुष प्रवाशाने विमानात महिलेच्या आसनावर लघवी केली. न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही किळसवाणी घटना घडली.
या महिलेच्या मुलीने ही घटना टिष्ट्वट करून या घटनेला वाचा फोडली. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारदार महिलेच्या मुलीने आपल्या टिष्ट्वटमध्ये एअर इंडियालाही टॅग केले आहे. टिष्ट्वटमध्ये तिने ‘न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी येथून दिल्लीला येत असताना आईच्या आसनावर एकाने लघवी केली. तिच्यासाठी ही अतिशय किळस आणणारी गोष्ट होती. या गोष्टींबाबत संबंधित यंत्रणांनी उत्तर द्यावे,’ असे म्हटले आहे.
जयंत सिन्हा यांनी याची दखल घेत एअर इंडियाला टिष्ट्वट करत, या बाबतीत लक्ष घालून कंपनीने लवकरात लवकर चौकशी करून त्याचे स्पष्टीकरण उड्डाण मंत्रालयाला द्यावे, असे सांगितले आहे. आतापर्यंत एअर इंडियाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.