इलेक्ट्रॉनिक, पर्यटक, वैद्यकीय, वगळून सर्व व्हिसांना परवानगी, सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 07:00 IST2020-10-23T04:16:51+5:302020-10-23T07:00:29+5:30
केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, अनिवासी भारतीय आणि भारतीय मुळाचे लोक कार्डधारक आणि इतर सर्व विदेशी नागरिक पर्यटन वगळता इतर कोणत्याही कारणासाठी भारतास भेट देऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिक, पर्यटक, वैद्यकीय, वगळून सर्व व्हिसांना परवानगी, सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक, पर्यटक आणि वैद्यकीय श्रेणीतील व्हिसा वगळता इतर सर्व व्हिसा तात्काळ प्रभावाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. कोविड-१९ महामारीमुळे तब्बल आठ महिने हे व्हिसा निलंबित होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, अनिवासी भारतीय आणि भारतीय मुळाचे लोक कार्डधारक आणि इतर सर्व विदेशी नागरिक पर्यटन वगळता इतर कोणत्याही कारणासाठी भारतास भेट देऊ शकतात. या निर्णयामुळे विदेशी नागरिकांना आता व्यवसाय, परिषदा, नोकरी, अभ्यास आणि संशोधन यांसारख्या कारणांसाठी भारतात येता येईल. वंदे भारत मिशन, हवाई वाहतूक बबल व्यवस्था अथवा नागरी उड्डयन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या कोणत्याही अनियोजित व्यवसायिक विमानाचा वापर करण्याची परवानगी त्यांना असेल.