शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Pegasus Snooping Case: पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय स्थापन करणार तज्ज्ञांची समिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:23 IST

Pegasus Snooping Case: ही समिती कशी असेल आणि तपास कसा पुढे जाईल याबाबत सविस्तर आदेश पुढील आठवड्यात येऊ शकतो.

Pegasus Snooping Case : पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहे. गुरुवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी याबाबत सांगितले. दरम्यान, ही समिती कशी असेल आणि तपास कसा पुढे जाईल याबाबत सविस्तर आदेश पुढील आठवड्यात येऊ शकतो. (Pegasus snooping row: SC to set up probe panel, formal order next week)

सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान न्यायालयात सांगितले की, काही तज्ज्ञांना समितीमध्ये भाग घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे, परंतु त्यापैकी बरेच जण वैयक्तिक कारणांमुळे समितीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी न्यायालयात वकील सीयू सिंह यांना सांगितले की, पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय या आठवड्यात एक समिती स्थापन करू इच्छित आहे. या समितीमध्ये ज्या लोकांचा समावेश करायचा आहे, त्यापैकी काही लोकांनी समावेश होण्यास नकार दिला आहे. तसेच, याबाबतचा आदेश पुढील आठवड्यापर्यंत येऊ शकतो. तांत्रिक तज्ज्ञांची समिती लवकरच अंतिम केली जाईल. 

दरम्यान,  यापूर्वी केंद्र सरकारकडून असे सांगितले गेले होते की, या संपूर्ण प्रकरणाची तज्ज्ञ समिती स्थापन करून चौकशी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वी पेगासस हेरगिरी प्रकरणाचा मुद्दा समोर आला होता. आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांनी दावा केला होता की, भारत सरकारने इस्रायली स्पायवेअरच्या आधारे देशातील अनेक राजकारणी, पत्रकार आणि देशातील इतर सेलिब्रिटींची हेरगिरी करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

पेगासस हेरगिरीच्या यादीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि इतर नेते, अनेक पत्रकार आणि काही केंद्रीय मंत्र्यांची नावे होती. त्यामुळे पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यात यावी, यासाठी काँग्रेसने निदर्शने केली होती.

(Pegasus : एका व्यक्तीच्या हेरगिरीसाठी किती आहे खर्च? जाणून घ्या...)

काय आहे पेगासस?पेगाससला  (Pegasus) इस्त्रायली सर्विलांस कंपनी NSO Group ने विकसित केले आहे. हे एक स्पायवेअर आहे. म्हणजेच याचा उपयोग कोणाच्याही हेरगिरीसाठी करता येईल. हे ऑनलाइन मिळणाऱ्या रँडम स्पायवेअरसारखे नाही. हे एक अतिशय अॅडव्हान्स आणि पॉवरफूल टूल आहे. हे टूल प्रत्येकजण विकत घेऊ शकत नाही. हे फक्त सरकारबरोबर काम करते असा कंपनीचा दावा आहे. याचा वापर मॅक्सिको आणि पनामा या सरकारांकडून केला जात आहे. ही गोष्ट सार्वजनिक क्षेत्रात आहे. रिपोर्टनुसार, या टूलचे 40 देशांमधील 60 ग्राहक आहेत. कंपनीने असे म्हटले आहे की, त्यांच्या युजर्सपैकी 51 टक्के लोक इंटेलिजेंट एजन्सी, 38 टक्के लोक लॉ इनफोर्समेंट आणि 11 टक्के लोक लष्करातील आहेत. कंपनीने वेबसाइटवर लिहिले आहे की, दहशतवाद आणि गुन्हांचा तपास करण्यासाठी हे मदत करते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcyber crimeसायबर क्राइम