Pawan Hans privatisation: आणखी एका सरकारी कंपनीची होणार विक्री, सरकार लवकरच घेणार निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 05:12 PM2022-10-12T17:12:08+5:302022-10-12T17:12:19+5:30

Pawan Hans privatisation: हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या पवन हंसची लवकरच विक्री होणार आहे.

Pawan Hans privatisation: government company Pawan Hans to be sold, government will decide soon | Pawan Hans privatisation: आणखी एका सरकारी कंपनीची होणार विक्री, सरकार लवकरच घेणार निर्णय...

Pawan Hans privatisation: आणखी एका सरकारी कंपनीची होणार विक्री, सरकार लवकरच घेणार निर्णय...

Next

Pawan Hans privatisation: केंद्र सरकार लवकरच आणखी एक सरकारी कंपनी विकणार आहे. हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या पवन हंस कंपनीची लवकरच विक्री होणार आहे. अल्मास ग्लोबल अपॉर्च्युनिटी फंड SPC विरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये प्रलंबित प्रकरणावर स्पष्टता आल्यानंतर सरकार पवन हंसच्या विक्रीवर या महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, अल्मास ग्लोबल प्रकरणाची सुनावणी या महिन्यात NCLAT मध्ये होणार आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्ही बोलीदाराला पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी वाजवी संधी (पवन हंसच्या विक्रीसाठी पुढे जावे की नाही) देऊ इच्छितो. पवन हंसमध्ये सरकार आणि ओएनजीसीची अनुक्रमे 51 आणि 49 टक्के हिस्सेदारी आहे. ही कंपनी हेलिकॉप्टर सेवा पुरवते.

कंपनीची 211 कोटी किंमत ठरली
एप्रिलमध्ये सरकारने हेलिकॉप्टर सेवा पुरवणारी पवन हंसला Star9 मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडला 211.14 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला होता. Star9 हे Big Charter Pvt Ltd, Maharaja Aviation Pvt Ltd आणि Almas Global Opportunity Fund SPC यांचे यांचे आहे.

यांनी लावलेल्या बोलीची किंमत सरकारने निश्चित केलेल्या 199.92 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीपेक्षा जास्त होती. परंतु मे महिन्यात, अल्मास ग्लोबल विरुद्ध प्रलंबित NCLT प्रकरणामुळे सरकारला पवन हंसची विक्री प्रक्रिया थांबवावी लागली. अल्मास ग्लोबलने आता या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी अपीलीय न्यायाधिकरणाकडे (एनसीएलएटी) धाव घेतली आहे.

Web Title: Pawan Hans privatisation: government company Pawan Hans to be sold, government will decide soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.