मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:46 IST2024-06-18T17:46:09+5:302024-06-18T17:46:46+5:30
धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता आज(मंगळवार) मुंबई, दिल्ली आणि पाटणासह देशातील 40 विमानतळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच, पोलिस आणि सीआयएसएफने परिसराची झडती घेतली. सुदैवाने काहीही संशयास्पद आढळले नाही. यापूर्वी एप्रिलमध्येही विमानतळ अधिकाऱ्यांना अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या.
बिहार | पटना एयरपोर्ट पर बम की धमकी वाला ईमेल मिला है। एयरपोर्ट पर सुरक्षा बढ़ा दी गई है। विस्तृत जानकारी का इंतजार है: पटना एयरपोर्ट निदेशक
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2024
यापूर्वी दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती, पण त्यातही काही आढळले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी सकाळी 9.35 वाजता IGI विमानतळाच्या डायल ऑफिसला एक ई-मेल मिळाला, ज्यात दिल्ली-दुबई फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली, पण त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.
#WATCH राजस्थान के जयपुर अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को आज बम की धमकी वाला ईमेल मिला। हवाई अड्डे पर सुरक्षा बढ़ा दी गई है।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2024
(वीडियो हवाई अड्डे के बाहर से है।) pic.twitter.com/2Lb8PYww94
विशेष म्हणजे, यापूर्वी एप्रिलमध्ये जयपूर, नागपूर, कानपूर, गोवासह देशातील अनेक विमानतळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने विमानतळाची झडती घेतली, मात्र काहीही सापडले नाही.
शाळांना बॉम्बच्या धमक्या
याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिस आयुक्तांच्या अधिकृत मेल आयडीवर हा धमकीचा मेल आला होता. त्यापूर्वी दिल्ली-एनसीआरमधील 150 शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यामुळे सर्वत्र दहशत पसरली होती. हा धमकीचा मेल दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्या अधिकृत मेल आयडीवर आला होता. धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास केला आणि तो फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले.