दुर्दैवी! बिहारमध्ये 15 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली, 7 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:11 PM2022-12-30T18:11:01+5:302022-12-30T18:11:10+5:30

बिहारमधील पटनामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटणा येथील मनेर टोला गंगा नदीत एक बोट उलटली आहे. या बोटीत अकूण 15 जण प्रवास करत होते.

patna boat full of passengers drowned maner mahavir tola ganga nandi ghat people missing search continues | दुर्दैवी! बिहारमध्ये 15 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली, 7 जण बेपत्ता

दुर्दैवी! बिहारमध्ये 15 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली, 7 जण बेपत्ता

Next

बिहारमधील पटनामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटणा येथील मनेर टोला गंगा नदीत एक बोट उलटली आहे. या बोटीत अकूण 15 जण प्रवास करत होते, यातील 7 जण अजुनही बेपत्ता आहेत. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोकांच्या मदतीने पोलिसांनी बोटीतील प्रवाशांचा शोध सुरू केला आहे. मणेर पोलिसांसह अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मणेर येथे गंगा नदीत एक बोट १५ जणांना घेऊन जात होती. यादरम्यान, बोट उलटली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. बोटीवरील लोक पाण्यात कोसळले. काहीजण यातून  बाहेर आले. तर यातील सात जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Dry Day List 2023: 'ड्राय डे'ची यादी जाहीर! २०२३ मध्ये एकूण २२ दिवस बंद राहणार दारुची दुकानं, वाचा...

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफची टीम गंगा नदीत लोकांचा शोध घेत आहे. बचावकार्य सुरू आहे. 

Web Title: patna boat full of passengers drowned maner mahavir tola ganga nandi ghat people missing search continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.