दुर्दैवी! बिहारमध्ये 15 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली, 7 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:11 IST2022-12-30T18:11:01+5:302022-12-30T18:11:10+5:30
बिहारमधील पटनामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटणा येथील मनेर टोला गंगा नदीत एक बोट उलटली आहे. या बोटीत अकूण 15 जण प्रवास करत होते.

दुर्दैवी! बिहारमध्ये 15 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली, 7 जण बेपत्ता
बिहारमधील पटनामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटणा येथील मनेर टोला गंगा नदीत एक बोट उलटली आहे. या बोटीत अकूण 15 जण प्रवास करत होते, यातील 7 जण अजुनही बेपत्ता आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोकांच्या मदतीने पोलिसांनी बोटीतील प्रवाशांचा शोध सुरू केला आहे. मणेर पोलिसांसह अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मणेर येथे गंगा नदीत एक बोट १५ जणांना घेऊन जात होती. यादरम्यान, बोट उलटली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. बोटीवरील लोक पाण्यात कोसळले. काहीजण यातून बाहेर आले. तर यातील सात जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफची टीम गंगा नदीत लोकांचा शोध घेत आहे. बचावकार्य सुरू आहे.