पाटसला नागेश्वराच्या मंदिरात

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

भाविकांची गर्दी

Patels at the temple of Nageshwar | पाटसला नागेश्वराच्या मंदिरात

पाटसला नागेश्वराच्या मंदिरात

विकांची गर्दी
पाटस : पाटस (ता. दौंड) येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी नागेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. नागेश्वरांना महाअभिषेक झाला. बेल, फूल आणि इतर पूजेच्या साहित्याची दुकाने मंदिराच्या परिसरात थाटलेली होती. या वेळी सकाळी मंदिरातून पालखी देवस्नानासाठी गार येथील भीमा नदीवर गेली. या वेळी नदीपात्रात नागेश्वरांना स्नान घालण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत पालखी पाटसच्या दिशेने निघाली. श्री नागेश्वर देवस्थान नवसाला पावणारे असल्याने भाविक पालखी मार्गावर ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी उभे होते. त्यानंतर पालखी जुन्या ग्रामपंचायतीजवळ आली. याठिकाणी निळकंठ बंदिष्ठी यांच्या हस्ते पालखीची आरती झाली. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्यानंतर पालखी नागेश्वर मंदिरात गेली. त्या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

फोटो ओळ : पाटस (ता. दौंड) येथे श्री नागेश्वराच्या पालखीचे स्वागत करताना भाविक. (छायाचित्र : मनोहर बोडखे)

17082015-िं४ल्लि-27
------------

Web Title: Patels at the temple of Nageshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.