"... तर मी २०२४ मध्ये त्याला जिंकवण्यासाठी सर्वकाही करेन"; अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:48 IST2021-02-01T19:43:08+5:302021-02-01T19:48:30+5:30
विरोधकांकडून अर्थसंकल्पावर करण्यात आली टीका

"... तर मी २०२४ मध्ये त्याला जिंकवण्यासाठी सर्वकाही करेन"; अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या अर्थसंकल्पाचं समर्थन केलं. तर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका करत त्याचा सामान्य व्यक्तीला कोणताही फायदा होणार नसल्याचं म्हटलं. दरम्यान, यानंतर पंतजलीचे आयुर्वेदचे संस्थापक बाबा रामदेव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जर अशा परिस्थितीत कोणी यापेक्षा चांगला अर्थसंकल्प तयार करून दाखवला तर २०२४ मध्ये त्याच्या विजयसाठी मी सर्वकाही करायला तयार आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
"सरकार धोरणं ठरवू सकतं. जर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढवायचंआहे तर त्यांना डेअरी उद्योग वाढवायला हवा. डेअरी उद्योगासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यांना जे काही आवश्यक आहे ते सरकारनं दिलं आहे. अशातच जे शेतकरी घरात गायी, म्हशी किंवा बकऱ्या पाळू शकतात त्यांनी यात उतरायला हवं," असं बाबा रामदेव म्हणाले.
"आपण जवळपास २ लाख कोटी रूपयांचं खाद्यतेल आयात करतो. ते जेव्हा आपल्या देशात तयार होऊ लागेल तेव्हा पाच वर्षांमध्ये कमीतकमी १२ ते १५ लाख कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळतील. सरकारकडे यासाठी पूर्ण आराखडा तयार आहे. परंतु हे लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनादेखील सरकारसोबत काम करावं लागेल," असंही ते म्हणाले. हा एक प्रोगरेसिव्ह अर्थसंकल्प आहे. यामुळे आरोग्य आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल. हा अर्थसंकल्प उत्तीर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात कोणतंही पाप नाही. हो सर्वोत्कृष्ठ अर्थसंकल्प आहे आणि कोणावरही अधिक भार येऊ नये याचा सरकारनं विचारही केल्याचा बाबा रामदेव म्हणाले.