शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Pashu Aadhar: माणसांचे झाले, आता म्हशींचेही आधार कार्ड बनणार; खुद्द मोदींनीच केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 16:19 IST

Aadhaar card for Buffalo, Cow: मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

गेल्या काही वर्षांत आधार कार्डने करोडो भारतीयांच्या आयुष्यात एक वेगळी पहाट आणली आहे. किसान योजना असो की अन्य कोणतीही सरकारी मदत थेट शेतकरी, नागरिकाच्या खात्यात जाते. यामुळे भ्रष्टाचार तेवढ्यापुरता कमी झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ऐकायला थोडी विचित्र वाटेल परंतू, म्हशीचेही आधार कार्ड काढण्याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे याची तयारीही सुरु झाल्याचे ते म्हणाले. 

मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सर्व दुग्धजन्य प्राण्यांचे आधार कार्ड बनविले जाणार आहे, असे ते म्हणाले. भारतातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे. भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डाटाबेस तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केले जात आहे, असे ते म्हणाले. 

आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागते. म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जाते. याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे, असे मोदी म्हणाले. पशु आधार असे या मोहिमेचे नाव देण्यात आले आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास मदत होईल, असे मोदींचे म्हणणे आहे. 

बन्नी म्हैस...गुजरातमधील कच्छमध्ये बन्नी म्हैशीची प्रजाती आहे. या म्हैशीचा मोदींनी एक किस्सा सांगितला आहे. दिवसा तिथे खूप उन असते. यामुळे ही म्हैस रात्रीच्यावेळी चरते. ती चाऱ्यासाठी गोठ्यापासून १५ ते १७ किमीचा प्रवास करते. परंतू दिवस उजाडू लागताच ती परत तिच्या गोठ्यात वाट न चुकता येते. बन्नी म्हैस गोठा किंवा रस्ता चुकल्याचे खूप कमी ऐकू येते. परदेशातून आलेल्या आमच्या मित्रांना हे ऐकून धक्का बसेल की ती जेव्हा चरायला जाते तेव्हा तिचा मालक किंवा गुराखी त्यांच्यासोबत नसतो. वाळवंटात पाणी कमी असते परंतू, त्या पाण्यातही तिचे भागते, असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी