शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सरकार, ओपिनियन पोलमध्ये दोन तृतियांश बहुमताचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 9:29 PM

सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये...

नवी दिल्ली - सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या झंझावाती प्रचारसभा आणि हार्दिक पटेलसह इतर नेत्यांचा काँग्रेसला मिळत असलेला पाठिंबा यामुळे ही निवडणूक भजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अवघड जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपा सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज प्रसिद्ध झालेल्या या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपाला 115 ते 125 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असे या सर्वेत नमूद करण्यात आले आहे.  गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोधाचा  सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचा भरणा असलेल्या गुजराती समाजामध्ये भाजपाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसत आहे. त्यामुळे भाजपाला यावेळची विधानसभा निवडणूक कठीण जाणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  हार्दिक पटेल निष्प्रभ या ओपिनियन पोलनुसार गुजरामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजावाजा झालेल्या हार्दिक पटेलचा प्रभाव पडणार नाही. पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल भाजपाला नुकसान करू शकत नाही. तसेच हार्दिक पटेल आणि काँग्रेस एकत्र आल्यास त्यामधूनही काँग्रेसला फारसा लाभ होणार नाही. हार्दिक पटेल काँग्रेससोबत असल्यात काँग्रेसच्या जागा किरकोळ प्रमाणात वाढून त्यांना 62 ते 71 पर्यंत पोहोचतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मुख्यमंत्री म्हणून रुपानी यांना पसंतीगुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पोलमध्ये विजय रुपानी यांना पसंत देण्यात आली आहे. रुपानी यांना 34 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेसच्या शक्ति सिंह गोहिल यांना 19 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस