"पार्टटाइम पॉलिटिक्स, फुलटाइम पर्यटन’’, परदेशात असलेल्या राहुल गांधींवर भाजपाची बोचरी टीका
By बाळकृष्ण परब | Updated: December 29, 2020 11:48 IST2020-12-29T11:47:38+5:302020-12-29T11:48:23+5:30
Rahul Gandhi News : राहुल गांधी हे काही वैयक्तिक कारणास्तव सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यावरून मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.

"पार्टटाइम पॉलिटिक्स, फुलटाइम पर्यटन’’, परदेशात असलेल्या राहुल गांधींवर भाजपाची बोचरी टीका
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वाडनाड लोकसभा मतदारसंघातील खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून पुन्हा एकदा बोचरी टीका करण्यात आली आहे. जो नेता पार्टटाइम पॉलिटिक्स आमि फुलटाइम पर्यटन करेल, अशा नेत्याला नानी आठवणे स्वाभाविक आहे, असा टोला भाजपा नेते मुख्यार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे. राहुल गांधी हे काही वैयक्तिक कारणास्तव सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यावरून मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.
राहुल गांधीवर टीका करताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, पार्टटाइम पॉलिटिक्स आणि फुलटाइम पर्यटन आणि पाखंड जो नेता करेल. त्याला नानी आठवणे स्वाभाविक आहे. आता नानी आठवल्यावर ते कुठे जातात हे याची माहिती केवळ त्यांनाच असते.
पार्ट टाइम पॉलिटिक्स, फ़ुल टाइम पर्यटन और पाखंड जो नेता करेगा, उसको नानी याद आएगी और जब नानी याद आती है तो वो कहां पहुंच जाते हैं इसका पता सिर्फ उनको ही होता है: केंद्रीय मंत्री और बीजेपी नेता मुख्तार अब्बास नक़वी pic.twitter.com/kvp0hM4b2y
— ANI_HindiNews (@AHindinews) December 29, 2020
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी इटलीच्या वैयक्तिक दौऱ्यावर गेल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, राहुल गांधी हे कौटुंबिक कारणास्तव परदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काल झालेल्या काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्यालाही राहुल गांधी अनुपस्थित होते.