शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा सभापतींनी तयार केलाय खास 'फ्रेंडशिप ग्रूप'; श्रीकांत शिंदे सगळ्यात तरुण मेंबर, काय आहे 'मिशन'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:22 IST

Parliamentary Friendship Groups India 2026: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ६४ देशांसाठी संसदीय मैत्री गट जाहीर केले आहेत. श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव यांसह अनेक नेत्यांची नियुक्ती. चीन-पाकिस्तानला वगळले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने भारताने जागतिक स्तरावर 'संसदीय मुत्सद्देगिरी' अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मिळालेल्या सूचनांनुसार, ६४ देशांसाठी विशेष 'संसदीय मैत्री गट' स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधकांनाही मोठी संधी देण्यात आली असून, राजकीय मतभेद बाजूला सारून देशाचे प्रतिनिधित्व करण्यावर भर दिला आहे.

या धोरणानुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जगातील ६४ देशांशी संवाद आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी 'संसदीय मैत्री गट' स्थापन केले आहेत. मुत्सद्देगिरीच्या या नव्या पर्वात श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या तरुण खासदारांपासून ८० वर्षीय पी. चिदंबरम यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. संसदीय कार्यप्रणाली पलीकडे जाऊन व्यापार, तंत्रज्ञान, संस्कृती आणि जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी हे गट महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या ६४ देशांच्या यादीत भारताने रणनीतिक विचार करून चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांचा समावेश केलेला नाही. शेजारील राष्ट्रांपैकी नेपाळच्या गटाचे नेतृत्व नीरज शेखर करणार आहेत.

युवा आणि अनुभवी नेतृत्वाचा संगमया उपक्रमात शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे सर्वात तरुण शिष्टमंडळ प्रमुख ठरले असून त्यांच्याकडे इंडोनेशियाची जबाबदारी आहे. तर ८० वर्षीय ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम इटलीच्या गटाचे नेतृत्व करतील.

विरोधकांचाही मोठा सहभागया शिष्टमंडळांमध्ये प्रियांका गांधी वड्रा (जपान) आणि प्रियांका चतुर्वेदी (पोर्तुगाल) यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर खासदारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ही व्यवस्था आता कायमस्वरूपी करण्यात आली आहे.

कोणाकडे कोणत्या देशाची धुरा? (महत्त्वाची नावे):

खासदारपक्षनियुक्त देश
श्रीकांत शिंदेशिवसेना (शिंदे गट)इंडोनेशिया (सर्वात तरुण प्रमुख)
सुप्रिया सुळेराष्ट्रवादी (शरद पवार गट)सिंगापूर
अखिलेश यादवसमाजवादी पक्षऑस्ट्रेलिया
कनिमोझीडीएमकेग्रीस
शशी थरूरकाँग्रेसफ्रान्स
बैजयंत पांडाभाजपअमेरिका
रविशंकर प्रसादभाजपयुनायटेड किंगडम
अनुराग ठाकूरभाजपयुरोपियन युनियन
अभिषेक बॅनर्जीतृणमूल काँग्रेसअल्जेरिया
असादुद्दीन ओवेसीएआयएमआयएमओमान

 

English
हिंदी सारांश
Web Title : Lok Sabha Speaker forms 'Friendship Group'; Shrikant Shinde youngest member.

Web Summary : Lok Sabha Speaker created parliamentary friendship groups with 64 nations, fostering diplomacy. Shrikant Shinde leads Indonesia group. Opposition included, focusing on global collaboration.
टॅग्स :om birlaओम बिर्लाShrikant Shindeश्रीकांत शिंदेlok sabhaलोकसभाParliamentसंसदShiv SenaशिवसेनाSupriya Suleसुप्रिया सुळे