"जय श्रीराम नाही, जय सियाराम बोला"; संसद परिसरात प्रियांका गांधींचा महिला खासदारांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:34 IST2024-12-05T12:34:42+5:302024-12-05T12:34:50+5:30
प्रियांका गांधी यांनी महिला खासदारांसोबत साधलेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

"जय श्रीराम नाही, जय सियाराम बोला"; संसद परिसरात प्रियांका गांधींचा महिला खासदारांना सल्ला
Priyanka Gandhi: केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्या संसदेत जात असून त्यांना ५१७ क्रमांकाची जागा देण्यात आली आहे. बुधवारी प्रियांका गांधी संसदेत पोहोचल्या तेव्हा काही महिला खासदारांनी त्यांना थांबवून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. हात मिळवल्यानंतर संसदेच्या संकुलातील महिला खासदारांनीही प्रियांका गांधी यांना जय श्री राम म्हटले. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बुधवारी संसद संकुलात वेगळ्याच प्रकारचे वातावरण पाहायला मिळाले. काही महिला खासदारांनी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्याशी हस्तांदोलन सुरू केले. हस्तांदोलन करताना महिला खासदारांनी प्रियंका गांधींना जय श्री राम म्हटले. त्यानंतर महिला खासदारांना प्रियांका गांधी यांनी हसून प्रत्युत्तर दिलं.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही महिला प्रियांका गांधी यांना संसदेच्या संकुलात भेटताना दिसत आहेत. प्रियांका गांधी त्यांच्याशी हस्तांदोलन करत असताना महिला खासदारांनी त्यांना जय श्री राम म्हटले. यावर प्रियांका यांनी आधी त्यांना जय हिंद असे उत्तर दिले आणि आपण महिला आहोत त्यामुळे जय सियाराम म्हणा. सीतेला सोडू नका, असं म्हटलं. प्रियांका गांधी यांनी हे म्हणताच महिला खासदारही हसताना दिसल्या.
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी प्रियांका गांधींचे कौतुक करताना, "जय सियाराम, आम्ही महिला आहोत, सीतेला सोडू नका. प्रियांका गांधीजींनी महिला खासदारांच्या जय श्री राम अभिवादनाला प्रत्युत्तर देत सीतेची आठवण करून दिली, जिच्याशिवाय प्रभू रामाचे नाव अपूर्ण आहे," असं म्हटलं.
“जय सियाराम 🙏
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) December 4, 2024
हम महिलायें हैं, सीता को मत छोड़ो”
महिला सांसदों के जय श्रीराम अभिवादन का जवाब @priyankagandhi जी ने उस माँ सीता की याद दिला कर दिया, जिनके बिना भगवान राम का नाम अधूरा है”
👏👏👏 pic.twitter.com/Dt2uF7hLga
राजकारणात पदार्पण केल्यानंतर प्रियांका तिच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडसाठीही सक्रिय दिसत आहे. "सरकारकडे प्रियांका गांधी यांनी भूस्खलनामुळे बाधित कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच शासनाच्या योजनेची माहिती घेतली. वायनाडच्या लोकांना आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांना अत्यल्प मदत मिळाली आहे. मला वायनाडच्या कृती आराखड्याबद्दल सरकारकडून जाणून घ्यायचे आहे," असं प्रियांका गांधींनी म्हटलं होतं.