शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
3
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
4
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
5
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
6
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
7
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
8
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
9
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
10
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
11
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
12
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
13
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
14
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
15
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
16
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
17
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
18
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
19
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:13 IST

यावेळी, खर्गे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. दरम्यान त्यांनी सभापती राधाकृष्णन यांनाही खास सल्ला दिला.

आज सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालेल. विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक कोपरख्या बघायला मिळाल्या. सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांचे स्वागत  केले. तसेच काँग्रेसाध्यक्षमल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्यांचे स्वागत केले. यावेळी, खर्गे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. दरम्यान त्यांनी सभापती राधाकृष्णन यांनाही खास सल्ला दिला.

सभापती सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "मला आशा आहे की, आपण दोन्ही बाजूंना समान न्याय द्याल. आपण आपल्या आसनावरून त्या बाजूला (सत्तापक्ष) फार बघू नका, इकडे धोका आहे आणि इकडे (विरोधक) बघितले नाही, तरी धोका आहे. यामुळे तुम्ही दोन्ही बाजूंमध्ये संतुलन राखल्यास बरे होईल."

यावेळी खर्गे यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "त्यांना (धनखड) निरोप समारंभाची संधी न मिळाल्याबद्दल दुःख वाटते. पण त्यांची प्रकृती बरी असेल, असी आशा आहे." त्यांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोध केला. ''खर्गे यांनी एक उल्लेख केला, हे योग्य केले नाही.''

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना लक्ष्य करत, संसद हे निवडणुकीतील पराभवानंतरची 'नाराजी' व्यक्त करण्याचे व्यासपीठ बनू नये, असे म्हणाले. यावर पलटवार करत खर्गे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी मुख्य मुद्द्यांवर बोलण्याऐवजी पुन्हा एकदा 'ड्रामेबाजी' केली. भाजपने आता दिशाभूल करण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांवर संसदेत चर्चा करावी.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kharge advises VP Radhakrishnan in Parliament: Beware of both sides!

Web Summary : In Parliament, Kharge cautioned VP Radhakrishnan to balance views from both ruling and opposition, highlighting potential risks. He also expressed sadness over the former VP's farewell, prompting a rebuttal from a minister. Modi urged focusing on real issues, not election grievances.
टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस