शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:23 IST

Parliament Session : 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. '

Parliament Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरशन सिंदूरवरुन बराच गदारोळ सुरू आहे. काल लोकसभेत यावर दीर्घ चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आपले म्हणने मांडले. त्यानंतर आता आज राज्यसभेत या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चर्चेची सुरुवात करताना, विरोधकांवर जोरदार टीका केली. 

मोदी सरकारच्या काळात काय बदल झाले? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "भारत अनेक वर्षांपासून सीमापार दहशतवादाचा सामना करत होता. आम्ही जे म्हणतो, तेच करुन दाखवतो. पूर्वी अशा मोठ्या घटना घडायच्या, तेवाहा त्यावर फारशी कारवाई केली जात नव्हती. मात्र, गेल्या दशकभरात आम्ही दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले, ज्यामुळे या कारवाया मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. आज दहशतवाद्यांना मिळणारा निधीही थांबला आहे."

पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू करार का केला?परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचा पाऊल असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, "जेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, तेव्हा असा सिंधू पाणी कराराची काय गरज होती? असे म्हटले गेले की, ही शांतीची किंमत आहे. मात्र, ही तुष्टीकरणाची किंमत होती. त्यांना पंजाब, राजस्थान, हरियाणातील शेतकऱ्यांची काळजी नव्हती. त्यांना पाकिस्तानच्या पंजाबमधील शेतकऱ्यांची काळजी होती."

मुंबईवर मौन राहिलेले लोक आज आम्हाला सांगतात"आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नाही, पाकिस्तान आहे. मात्र, असे असूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी आपली बाजू घेतली. रशियासह अनेक देशांनी जाहीररित्या भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला, यावरुन आमची राजनैतिक कूटनीति किती यशस्वी झाली, हे स्पष्ट होते. आम्ही पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केला. सिंधू जल करार स्थगित कला. भारताने कसा प्रतिसाद दिला, संपूर्ण जगाने पाहिले. आम्ही जगासमोर पाकिस्तानचा चेहरा उघड केला. मुंबईच्या घटनेवर मौन राहिलेले लोक आज आम्हाला काय करावे, हे शिकवत आहेत", अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

कान उघडून ऐका, ट्रम्प आणि मोदींमध्ये एकही फोन कॉल झाला नाहीपरराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा सांगितले की, "जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. अमेरिका, सौदी अरेबियासह अनेक देशांशी आमची चर्चा झाली, सर्व कॉल रेकॉर्डवर आहेत. ते माझ्या सोशल मीडिया हँडलवर देखील आहे. आम्ही सर्वांना हेच सांगितले की, जर पाकिस्तानला संघर्ष थांबवायचा असेल, तर त्यांनी आमच्या डीजीएमओ चॅनेलद्वारे विनंती करावी. १२ एप्रिल ते २२ जून या काळात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झाला नाही."

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाParliamentसंसदS. Jaishankarएस. जयशंकरcongressकाँग्रेसBJPभाजपा