नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील 'धन्यवाद प्रस्तावा'वर उत्तर देणार आहेत. काल लोकसभेत झालेल्या अभूतपूर्व गदारोळानंतर आज राज्यसभेत पंतप्रधान काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
बुधवारी लोकसभेत पंतप्रधान मोदी उत्तर देणार होते. परंतू त्यापूर्वीच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि मोदी यांचे आसन घेरले. यामुळे मोदी लोकसभेत आलेच नाहीत. विरोधक महिला खासदारांनी आसनासमोर धाव घेत घेरल्यामुळे सभागृहातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते.
आजच्या भाषणाचे महत्त्वलोकसभेतील अनुभवानंतर आज राज्यसभेत पंतप्रधान मोदी विरोधकांच्या आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारचे व्हिजन आणि विकासकामांचा आढावा मांडण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना उत्तरे देतील की नाही हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विरोधकांवर प्रहारकालच्या गोंधळाचा संदर्भ देऊन पंतप्रधान विरोधकांच्या संसदीय वर्तनावर भाष्य करू शकतात. विकसित भारताच्या संकल्पनेवर भर देत आगामी काळातील महत्त्वाच्या निर्णयांचे सूतोवाच या भाषणात होऊ शकते. संसदेच्या दोन्ही सभागृहात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळत असून, आजच्या संबोधनामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
Web Summary : Following Lok Sabha's uproar, PM Modi addresses Rajya Sabha on the 'Motion of Thanks.' All eyes are on his response to opposition's accusations and his vision for India. He may address parliamentary conduct and future decisions.
Web Summary : लोकसभा में हंगामे के बाद, पीएम मोदी राज्यसभा में 'धन्यवाद प्रस्ताव' पर बोलेंगे। सबकी निगाहें विपक्ष के आरोपों पर उनकी प्रतिक्रिया और भारत के लिए उनके दृष्टिकोण पर हैं। वह संसदीय आचरण और भविष्य के निर्णयों पर बात कर सकते हैं।