शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

संसदेच्या बजेट सत्रात कामकाजाचा बोऱ्या, अविश्वास ठराव आलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 5:49 AM

संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही. अपवाद एससी/एसटी अ‍ॅक्टचा. भारत बंदच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या निमित्ताने गृहमंत्री राजनाथसिंग यांनी ६ मिनिटांचे निवेदन केले. त्यावरील चर्चा दीड मिनिटांत आटोपली.लोकसभेत ४ एप्रिलपर्यंत सत्ताधारी व विरोधक यांची २0१९ वेळा आरडाओरड झाली, तर ५८ प्रसंगी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत सदस्यांनी घोषणाबाजी केली. कावेरी बोर्ड स्थापनेसाठी अद्रमुक सदस्यांचा गोंधळ सर्वाधिक होता. सत्ताधारी पक्षालाच कामकाज नको असल्याने अद्रमुक सदस्यांना गोंधळ घालायला लावल्याचा आरोपही विरोधकांनी केला. लोकसभा अध्यक्षांनी ६0 वेळेस सदस्यांना ‘आपापल्या जागेवर जा, गदारोळामुळे मला कोणाचेही म्हणणे ऐकू येत नाही, आता पुरे झाले’, असे आवाहन करूनही उपयोग झाला नाही. अध्यक्षांनी ४४ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. त्या ४२ वेळा ‘आय एम सॉरी’ म्हणाल्या. लोकसभा अन् राज्यसभेचे कामकाज किमान १५ वेळा दोन ते तीन मिनिटांत संपले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून तेलगू देशमने गोंधळ घातला, तर अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी काँग्रेस, तृणमूलसह अन्य विरोधकही आक्रमक होते.सेनेचा विरोधदुसºया सत्राच्या २३ दिवसांत कोणतेही महत्त्वाचे कामकाज न झाल्याने एनडीएचे सदस्य २३ दिवसांचा पगार व भत्ते घेणार नसल्याची घोषणा संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी केली. मात्र हे आम्हास मान्य नाही, आमचा पगार दान करायचा अथवा तो कुठे कोणासाठी खर्च करायचा, याचा निर्णय शिवसेना घेईल, आमच्या वतीने हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही कोणाला दिलेला नाही, असे खा. संजय राऊ त म्हणाले.वित्त विधेयके व ४ अन्य विधेयके चर्चेशिवाय मंजूर झाली. सरकारवरील अविश्वासाचा प्रस्ताव दाखलच करून घेतला नाही. राज्यसभेत सुषमा स्वराज यांचे इराकमध्ये ३९ भारतीयांच्या हत्येबाबतचे निवेदन, निवृत्त सदस्यांना निरोप व नव्या सदस्यांचा शपथविधी हेच नीट झाले.लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. प्रश्नांना लेखी उत्तरे मिळाली. पहिल्या सत्रात कामकाज २५ तास ५४ मिनिटांचे होते व झाले २८ तास २४ मिनिटे. दुसºया सत्रात १0३ तास २७ मिनिटे वेळ वाया गेली.

टॅग्स :ParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनnewsबातम्या