उद्यान...........बातमीचा जोड, अर्जंट वाचून देणे
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30
इन्फो.............

उद्यान...........बातमीचा जोड, अर्जंट वाचून देणे
इ ्फो.............पक्षी निरीक्षण केंद्राला वावके. सी. ठाकरे उद्यान हे भविष्यात पक्षी निरीक्षण केंद्रही ठरू शकते. कारण गोदाकाठी हे उद्यान असल्यामुळे भारद्वाज, कोकीळ, दयाळ, चातक, बुलबुल, सातभाई, रानखाटिक, धनेश, घुबड, सूर्यपक्षी, चष्मेवाला आदिंचा उद्यानात किलबिलाट असतो. उद्यानातील वृक्षांवर पक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. उद्यानाचा विकास साधला आणि या ठिकाणी ठिय्या मांडून बसणार्या मद्यपींचे टोळक्यांना मज्जाव घातला तर हे उद्यान भविष्यात पक्षी निरीक्षण केंद्र म्हणून उदयास येईल. शहरातील पक्षिप्रेमी, निसर्गप्रेमींकडूनदेखील पालिकेला याबाबत साद घातली, तर शहराच्या विकासात भरही पडेल आणि नाशिककरांना उत्तम पर्यटनस्थळही लाभेल अशी अपेक्षा जागरूक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.इन्फो............उद्यान केवळ नावालाचके. सी. ठाकरे उद्यानाची मोठी दुर्दशा झाली असून, उद्यानाकडे जाणार्या दगडांच्या बनविलेल्या आकर्षक पायर्यांचीही पडझड झाली आहे. बहुतांश दगड निखळून पडल्याने प्रवेश करताच उद्यानाच्या विदारकतेचे दर्शन घडते. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराचा अर्धा भागही चोरट्यांनी लंपास केल्याने उद्यानात चोवीस तास प्रवेश खुला असतो. त्यामुळे मद्यपींचे फावले असून, सर्रासपणे भरदिवसाही या ठिकाणी ओल्या पार्ट्या रंगतात. उद्यानामध्ये तयार करण्यात आलेल्या दगडांच्या पायवाटांचीही दुरवस्था झाली आहे. तसेच कौलारू पॅगोड्याचीही टवाळखोर मद्यपींनी नुकसान केले असून, बहुतांश कौलं फुटले आहे. उद्यानाच्या एका बाजूला रानगवताचेही साम्राज्य वाढले आहे. तसेच उद्यानात तयार करण्यात आलेल्या लोखंडी पुलाचीही दुरवस्था झाली आहे. मद्याच्या बाटल्यांचा कचराउद्यानात ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या व चकणा म्हणून खाल्लेले वेफर्स, फरसाणचे पॅकेट, प्लॅस्टिकचे ग्लास याचा कचरा पहावयास मिळतो. या उद्यानाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली असून, तातडीने विकास करण्याची मागणी होत आहे.फोटो क्रमांक : १७पीएचएमअे ९२ ते १००