पारशरी नदी तिरावरील स्मशानभूमीत अघोरी कृत्य

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30

पिंपळगाव बसवंतचे नागरिक भयभीत

The Parishari River is a terrible thing in the cremation ground | पारशरी नदी तिरावरील स्मशानभूमीत अघोरी कृत्य

पारशरी नदी तिरावरील स्मशानभूमीत अघोरी कृत्य

ंपळगाव बसवंतचे नागरिक भयभीत
पिंपळगाव बसवंत : येथील मुखेडरोड पाराशरी नदी किनारी असणार्‍या अमरधाममध्ये चिता रचण्याच्या जागेवर रात्री अघोरी कृत्याचा प्रकाराने नागरिकांमध्ये घबराट झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपळगाव बसवंत येथील वणी रोडवर अंबिका नगर ही बहुतांशी आदिवासी तसेच मजुरी करणार्‍या लोकांची वसाहत आहे. सदर वसाहतीची लोकसंख्या लक्षात घेता ग्रामपंचायतीने पाराशरी नदीवर अमरधाम नव्याने बांधून दिले आहे. या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून स्मशानभूमीतील चिता रचण्याच्या जागेवर रोज मध्यरात्री केव्हातरी अघोरी कृत्य करण्याचा प्रकार घडत आहे. सदरचा प्रकार हा गेल्या आठ दिवसांपासून चालू असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन तर्क-विर्तक केला जात आहे. स्मशानभूमित चिता रचण्याच्या जागेवर लिंबाच्या माळी, नाराळाची पाने तसेच कलश ठेऊन काळ्या बाहुल्या व बांबुच्या तिरड्या तसेच दोर्‍यांच्या सा‘ाने चितेला बांधण्यात आल्याचे दृश्य दिसत होते. तसेच आसपास कोंबड्याचे कापलेले पाय आढळून आले असून, सदरचा प्रकार हा आठ दिवसांपासून सुरू असल्याने नागरिक भयभयीत झाले आहेत.

Web Title: The Parishari River is a terrible thing in the cremation ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.