शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'हंसी तो फंसी!', 'रेणुका चौधरींच्या कुत्सित हसण्यावरुन परेश रावल यांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:53 IST

भाजपा खासदार आणि अभिनेता परेश रावल यांनीही वाहत्या पाण्यात हात धूत रेणुका चौधरींना टोला मारला आहे

नवी दिल्ली - राज्यसभेतील काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या कुत्सित हसण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोमणा मारल्यानंतर सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत आहे. भाजपा खासदार आणि अभिनेता परेश रावल यांनीही वाहत्या पाण्यात हात धूत रेणुका चौधरींना टोला मारला आहे. 'हंसी तो फंसी!', असं ट्विट परेश रावल यांनी केलं आहे. परेश रावल यांनी आपल्या ट्विटमध्ये भलेही रेणुका चौधरी यांचं नाव घेतलेलं नसलं, तरी सध्या राज्यसभेत रेणुका चौधरी यांच्या हसण्यावरुन सुरु असलेल्या वादावर हे ट्विट असल्याचं स्पष्ट आहे. परेश रावल यांनी याआधीही अनेक नेत्यांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं. परेश रावल यांनी ट्विट केल्यानंतर अनेक युजर्सनीही कमेंट करण्यास सुरुवात केली. सुमन शेखर सिंह यांनी लिहिलं आहे की, सर जी, जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तैसी…।

 

काय आहे प्रकरण - पंतप्रधान मोदी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेत बोलत होते. यावेळी मोदींच्या एका विधानावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी जोरजोरात हसायला लागल्या. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत रेणुका चौधरी यांना कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, मोदींनी यावेळी कमलीचा हजरजबाबीपणा दाखवत रेणुका चौधरी यांना सणसणीत टोला लगावला. त्यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना रेणुका चौधरी यांना काही म्हणू नका, असे म्हटले. कारण रामायण मालिका संपल्यानंतर आज पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं, असे सांगत मोदींनी चौधरींच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली. यानंतर सभागृहात मोठा हशा पिकला. रेणुका चौधरी यांनी काही म्हणण्याचा प्रयत्न केला पण सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाल्यानंतर त्यांना शांत बसावे लागले.

दुसरीकडे मोदींनी रेणुका चौधरी यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी असे वक्तव्य करून स्त्रियांचा अपमान केला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर रेणुका चौधरी यांनी मोदी यांनी त्यांचे संस्कार दाखवून दिल्याचे म्हटले. मी पंतप्रधानांइतक्या खालच्या पातळीला जाऊ इच्छित नाही. मात्र, यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांची मानसिकता दिसून आल्याचे रेणुका चौधरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Paresh Rawalपरेश रावलTwitterट्विटर