शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

'चाय-वाला विरूद्ध बार-वाला' ट्विट करून फसले परेश रावल, ट्विट डिलीट करून मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 11:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने केलेलं आक्षेपार्ह ट्विट वादात आल्यानंतर आता अभिनेते व भाजपा खासदार परेश रावल वादात आले आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने केलेलं आक्षेपार्ह ट्विट वादात आल्यानंतर आता अभिनेते व भाजपा खासदार परेश रावल वादात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त ट्विटनंतर परेश रावल यांनी त्या ट्विटला उत्तर देताना तसंच एक वादग्रस्त ट्विटकरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने केलेलं आक्षेपार्ह ट्विट वादात आल्यानंतर आता अभिनेते व भाजपा खासदार परेश रावल वादात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त ट्विटनंतर परेश रावल यांनी त्या ट्विटला उत्तर देताना तसंच एक वादग्रस्त ट्विटकरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'आमचा चहावाला तुमच्या बार वाल्यापेक्षा कधीही चांगला आहे', असं ट्विट परेश रावल यांनी केलं. 

परेश रावल यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर परेश रावल यांच्यावर जोरदार टीका व्हायला सुरूवात झाली. सोशल मीडियावरील टीका वाढत गेल्यावर परेश रावल यांनी ट्विट डिलीट करून माफी मागितली. 'मी केलेलं ट्विट योग्य नव्हतं. म्हणून ते मी डिलीट करतो आहे. लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो', असं म्हणत परेश रावल यांनी पहिलं ट्विट डिलीट केलं. 

 

नेमकं प्रकरण काय ?काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट मंगळवारी (21 नोव्हेंबर) ट्विटरवर शेअर करण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे या तिघांच्या फोटोवर आधारित एक मीम पोस्ट ट्विटरवर पोस्ट करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहा विकण्यावर खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय युवा काँग्रेसच्या 'युवा देश' या ऑनलाइन नियतकालिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हे अपमानास्पद तसंच वादग्रस्त 'मीम' तयार केलं. दरम्यान, सोशल मीडियातून टीकेचा भडिमार झाल्यानंतर हे वादग्रस्त ट्विट डिलिट करण्यात आलं.

'मीम'मध्ये नेमका काय आहे मजकूर? पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील संभाषणाचे मीम तयार करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'विरोधीपक्ष आपल्यावर कशा पद्धतीचे मेमे बनवतात, असे सांगत आहेत. तर त्याला मेमे नाही तर मीम म्हणतात असे ट्रम्प यांनी मोदीं सांगितले. तर थेरेसा मे मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना 'तुम्ही चहाच विका' असे अपमानास्पद व वादग्रस्त मीम तयार करण्यात आले. काँग्रेसची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागली.  त्यानंतर काँग्रेसनं तातडीने हे ट्विट डिलीट केलं. 

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसTwitterट्विटर