नवीन वर्षात पनवेलकरांना मीटरने पाणी पालिकेचा हिरवा कंदील : इलेक्ट्रो मॅग्नेटिक मीटर बसविणार

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

पनवेल : पनवेलकरांना मिळणार्‍या पाण्याचे अचूक मोजमाप करण्याकरिता मीटर बसविण्याचा विषय गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता. पाणी गळती आणि तूट कमी करण्याकरिता शहरात सुमारे दहा हजार मीटर बसविण्याचा प्रस्ताव आहे. त्याला पालिकेच्या सभेत हिरवा कंदील मिळाला. लवकरच हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीकरिता एमजेपीकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर लागलीच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Panvelkar to set up an electro magnetic meter in the new year | नवीन वर्षात पनवेलकरांना मीटरने पाणी पालिकेचा हिरवा कंदील : इलेक्ट्रो मॅग्नेटिक मीटर बसविणार

नवीन वर्षात पनवेलकरांना मीटरने पाणी पालिकेचा हिरवा कंदील : इलेक्ट्रो मॅग्नेटिक मीटर बसविणार

वेल : पनवेलकरांना मिळणार्‍या पाण्याचे अचूक मोजमाप करण्याकरिता मीटर बसविण्याचा विषय गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता. पाणी गळती आणि तूट कमी करण्याकरिता शहरात सुमारे दहा हजार मीटर बसविण्याचा प्रस्ताव आहे. त्याला पालिकेच्या सभेत हिरवा कंदील मिळाला. लवकरच हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीकरिता एमजेपीकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर लागलीच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पनवेल शहराला दररोज २४ एमएलडी पाण्याची गरज आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणातून १६ एमएलडी पाणी जानेवारी ते मार्चपर्यंत येते. उर्वरित पाणी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि एमआयडीसीकडून विकत घेतले जाते. एकंदरीत देहरंग धरण आणि एमजेपी व एमआयडीसीकडून आलेले पाणी किती खर्च होते, त्याचबरोबर शहराला नेमकी किती पाण्याची गरज आहे, याबाबत इत्यंभूत माहिती मिळत नाही. एकंदरीत पाण्याचे अचूक ऑडिट होत नसल्याने पालिकेला पाण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च येत आहे. एमजेपीकडून थकबाकीसाठी पालिकेला वारंवार तगादा लावण्यात येत आहे. एवढेच नाही तर पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशाराही देण्यात आला होता. कोट्यवधी रुपये पाण्यात जात असल्याने पनवेलमध्ये मीटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा, असा प्रस्ताव तत्कालीन नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर आणि सुनिल मोहोड यांच्या काळात पुढे आला होता. त्यावेळचे पाणीपुरवठा सभापती सुभाष भुजबळ, जयवंत महामुनी यांनीही मीटरकरिता आग्रह धरला होता, मात्र पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हा प्रस्ताव बारगळला, परंतु नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी हा महत्त्वकांक्षी आणि पालिकेचा फायदा करून देणारा प्रकल्प हाती घेण्याकरिता पुढाकार घेतला. मध्यंतरी निवडणुका जाहिर झाल्याने हा विषय काहीसा मागे पडला, परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या पालिकेच्या सभेत मीटर बसविण्याचा प्रस्तावाला हिरवा कंदील दिला.

चौकट
खाजगी एजन्सीला काम देण्याचा प्रस्ताव
पनवेल शहरात सुमारे दहा हजार मीटर बसविण्यात येणार असून हे काम खाजगी एजन्सीच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव आहे. सर्व मीटर इलेक्ट्रो मॅग्नेटिक असून अर्धा इंची कनेक्शन असणार्‍या रहिवाशांना पालिका मीटर बसवून देणार आहे. त्याचबरोबर मोठ्या सोसायट्यांना मीटर बसवून घेण्याकरिता नोटीस देण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

जितके पाणी तितके पैसे
मीटर बसवल्यानंतर जितके पाणी वापरले जाईल तितके पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे पाण्याचे ऑडिट करणे शक्य होणार आहे.पाण्यामुळेनिर्माणहोणारीतूटअडीचपटीनेकमीहोणारअसूनबचतहोणारआहे.हेपैसेविकासकामासाठीवापरतायेणारआहेत.

मनसोक्त पाणी भरा
पनवेल पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पनवेलमधील इमारती आणि घरांना पाणी सोडले जाते. नळजोडणी आकारून पालिकेने पाण्याचे दर ठरवले असून त्यानुसार पाणीप˜ी वसूल केली जाते. ठराविक रक्कम भरा आणि मनसोक्त पाणी भरा, अशी स्थिती पनवेलमध्ये आहे. आजही अनेक व्यवसायिक घरगुती दराने पाणीप˜ी भरून व्यवसायिक कारणासाठी मुबलक पाणी वापरतात.

Web Title: Panvelkar to set up an electro magnetic meter in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.