पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाचे एकत्रीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मिशन 350' च्या रणनितीचा भाग ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 06:08 PM2017-08-21T18:08:19+5:302017-08-21T18:13:24+5:30

अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल.

Panierselwam-Palaniiswamy group merger of Prime Minister Narendra Modi's 'Mission 350'? | पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाचे एकत्रीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मिशन 350' च्या रणनितीचा भाग ?

पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाचे एकत्रीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मिशन 350' च्या रणनितीचा भाग ?

googlenewsNext

चेन्नई, दि. 21 - अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठया प्रमाणावर उलथापालथ झाली. आता सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही गटांना एकत्र आणण्यामागे भाजपाची रणनिती असल्याची चर्चा आहे. भाजपाने या विलीनीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली. 

व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधीच्या सोहळयाला पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी दोघांशी चर्चा केली होती. दोन्ही गटांच्या या एकत्रीकरणानंतर अण्णाद्रमुक आता एनडीएमध्ये सहभागी होईल अशी चर्चा आहे. भाजपाने आतापासूनच 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 

मिशन 2019 मध्ये केंद्राची सत्ता परत मिळवण्यात मोदींना अण्णाद्रमुकच्या एकत्रीकरणाचा फायदा होणार आहे. तामिळनाडूत भाजपाला अजून आपला जनाधार तयार करता आलेला नाही. इथे फक्त अडीच टक्के मते मिळवणा-या भाजपाला निश्चितच या विलीनीकरणाचा भविष्यात लाभ होईल. भाजपाने मिशन 2019 साठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. ते अण्णाद्रमुकमुळे पूर्ण होऊ शकते. 

व्ही.के.शशिकलाच्या कुटुंबाची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी आणि जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाचा सीबीआय तपास या पनीरसेल्वम गटाच्या दोन मुख्य मागण्या होत्या. पन्नीरसेल्वम पक्षाचे निमंत्रक तर ई. पलानीसामी सहनिमंत्रक असतील अशी माहिती समोर आली आहे. शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, ओ. पन्नीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सुकाणू समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षांतर्गत अधिकार येतील. 

या तडजोडीनुसार, पलानीस्वामी यांच्याकडे सरकारची, तर पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.पनीरसेल्वम यांच्या गटाने असा आग्रह केला आहे की, शशिकला यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर सर्व पदाधिका-यांनी स्वाक्ष-या कराव्यात. लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी टीटीव्ही दिनकरन यांना उपमहासचिव पदावरून हटविण्याच्या १० आॅगस्ट रोजीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नव्हती. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे थंबीदुराई यांच्याकडे प्रचार सचिव आणि पक्षाचे खासदार नवनीत कृष्णन व विजिया सत्यानंद यांच्याकडे अनुक्रमे वकील शाखा व महिला शाखेची जबाबदारी देण्यात येईल.

Web Title: Panierselwam-Palaniiswamy group merger of Prime Minister Narendra Modi's 'Mission 350'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.