शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

विमान हवेत असताना 'तो' अचानक उठला, विमानात दहशतवादी असल्याचं म्हणत ओरडू लागला अन्...

By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 11:41 AM

विमान गोव्यात उतरताच प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं

नवी दिल्ली: एका प्रवाशानं विमानात दहशतवादी असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी एअर इंडियाच्या विमानात हा प्रकार घडला. मानसिक आजाराची पार्श्वभूमी असलेला एक प्रवासी दिल्लीहून गोव्याला निघाला होता. विमान हवेत असताना त्यानं दहशतवादी लपून बसल्याचा दावा केला. त्यामुळे सगळेच प्रवासी घाबरले. विमानात दहशतवादी असल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाचं नाव झिया उल हक असं आहे. तो दिल्लीचा रहिवासी आहे. आपण दिल्ली पोलीस दलाच्या स्पेशल सेलमध्ये काम करत असल्याचा दावा त्यानं केला. एअर इंडियाचं विमान गोव्यातल्या विमानतळावर उतरताच त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.गुरुवारी एअर इंडियाच्या विमानानं दिल्लीहून गोव्यासाठी प्रयाण केलं. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता झिया उल हक नावाचा प्रवासी अचानक स्वत:च्या आसनावरून उठला आणि विचित्र वर्तन करू लागला. या विमानात दहशतवादी आहेत. मी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातला अधिकारी आहे, असं तो सांगू लागला. यामुळे विमानातल्या इतर प्रवाशांची चिंता वाढली.विमान गोव्यात उतरताच झिया उल हकला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी हकची चौकशी सुरू केली. त्याच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं. त्यांनी हकला मानसिक आजार असल्याचं सांगितलं.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया